प्रेमाचा तो मौसम होता

Started by Çhèx Thakare, April 09, 2013, 03:08:13 PM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

प्रेमासाठी स्वर्ग गाठला!!!

प्रेमाचा तो मौसम होता
रान गजबजलेले सारे,
वारा आला, फांदी तुटली
... अवचित विपरीत घडले रे!!!

दोन पक्षी भिन्न जातीचे
प्रेमात पार बुडाले, वेडे,
जिवंत असता या जन्मी
कधी न त्यांची भेट घडे!!!

एके दिवशी भेट घडता
वैरी झाला समाज त्यांचा,
करुन वार चोचीचे त्यांना
जीव घेतला त्या दोघांचा!!!

कळले प्रेम कुणास न त्यांचे
देवही तेव्हा जागा झाला,
बघुन हा प्रकार सारा
देवाचाही अश्रू सांडला!!!

मरता मरता वचन दिले
त्या दोघांनी एकमेकांना,
या जन्मी तर जमले नाही
पुढल्या जन्मी भेटु पुन्हा!!!

त्या दोघांचा आत्मा तेव्हा
अनंतात त्या विलीन झाला,
भेटीसाठी मग वेड्यांनी
देवाचा तो स्वर्ग गाठला!!!
देवाचा तो स्वर्ग गाठला!!! 



Author Unknown

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Çhèx Thakare


rudra


मिलिंद कुंभारे


Ankush S. Navghare, Palghar


Madhura Kulkarni

मी स्पष्ट बोलणार्यांपैकी आहे.....कविता नीटशी उमगली नाही. काही ठिकाणी मला व्याकरणातील चुकाही आढळून आल्या. इतरांनी अश्या कॉमेण्ट कश्या दिल्या; याचंच आश्चर्य वाटून राहिलंय मला.

मिलिंद कुंभारे

मधुर ताई ...
हा नवखाच कवी ना ...मग त्यास थोडे प्रोत्साहन नको का द्यायला ?????

मी स्पष्ट बोलणार्यांपैकी आहे....पुणेकर वाटतं .... :)

Madhura Kulkarni

पुणेकरच आहे मी.....

नवखा कवी आहे म्हणूनच सुधारणा सांगायला हव्यात....नाहीतर या चुका तो कधी सुधारणार? आणि कॉमेंट खरी द्यावी...एखाद्याला बर वाटावं म्हणून नव्हे.

मिलिंद कुंभारे

#9

मधुर ताई ...
एकदम कडक ...... आवडला आपला स्पष्ट वक्तेपणा ......
पण ह्या कवितेत खूप काही फारश्या, फारच दाखल घ्याव्या अशा चुका मला तरी आढळल्या नाहीत!  :'(