मी स्वताच खेळत बसतो...

Started by कवि - विजय सुर्यवंशी., April 29, 2013, 08:27:51 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

  मी स्वताच खेळत बसतो...
.
.
.
आयुष्याची स्वप्नं विनताना....
विचार मी तुझाच करतो.....
मनातल्या भावनात मग...
स्वताच खेळत बसतो...
.
.
.


      खेळ खेळन्या येती सर्व धागे..
      अन अलगद त्या धाग्यांमागे...
      फेर आठवणीचा धरतो....
      मी स्वताच खेळत बसतो....
.
.
.


कधी सुखाचे तर कधी दुखाचे...
तुझ्या सोबतीचे अन तुझ्या विरहाचे...
विरानिच्या गीतालाही सुर मंजुळ देतो...
मी स्वताच खेळत बसतो......
.
.
.


     एकांतालाही माझ्या आभास तुझ्या सोबतीचा...
     स्पर्श तुझा जणु चन्द्र तो नवतीचा....
     आसवांच्या डोहातही तुला न्याहाळत असतो..
     मी स्वताच खेळत बसतो....
.
.
.


स्वप्नांच्या त्या भ्रमनात.....
मी तुझ्याच कवेत असतो....
तुझ्या हर्ष्या सामोरी....
मज मीही फिका वाटतो....

        मनातल्या भावनात मग...
        स्वताच खेळत बसतो....
.
.
.



   कवि - विजय सुर्यवंशी.
           (यांत्रिकी अभियंता)

मिलिंद कुंभारे


केदार मेहेंदळे


कवि - विजय सुर्यवंशी.

#3
 :) :) thanks milindji ...

कवि - विजय सुर्यवंशी.


rudra

vijay avadli kavita....swtahashich khelat basne faar kathin aste...

कवि - विजय सुर्यवंशी.

THANKS रुद्रा। :)
.
.
.
खेळ माझा होता न्यारा...
भावनांच्या गर्तेत तिच्या आठवणींचा पसारा...
कधी कधी माणसाला स्वतावर हसावे लागते...
आठवणीत कुणाच्यातरी खेळत बसावे लागते...
आभासी या खेळात रंगण्या कुणीतरी स्वताचं असावे लागते...
.
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
        (यांत्रिकी अभियंता)

rudra

vijay tuzha ya pratikriyevar malahi kahi oli suchlya aahet...

कवि - विजय सुर्यवंशी.

स्वागत आहे रुद्रा ऐकव :)

rudra

खेळण्याचा हा भाव निराळा

जिंकण्या हरण्याचा हा डाव निराळा

कुणाच्या हरण्याने मन सुखावते,

कुणी जिंकणाऱ्याचे गाव निराळे...

पाहिला,हा खेळाचा मी रंगच न्यारा   

कधी हसणे मिश्किल स्वतःवरले,

कधी कुणी रडणाऱ्यांचे सांत्वन करावे...

                                                     - रुद्र