भरवसा नाही याचा असा बेफाम पाऊस...

Started by Bhagyashree Kulkarni, June 18, 2013, 01:50:00 PM

Previous topic - Next topic

Bhagyashree Kulkarni

भरवसा नाही याचा असा बेफाम पाऊस,
कुठे केंवा कधी कसा नको नियम लावूस...


कधी ढगातून येतो, कधी डोळ्यातून येतो,
जमलेल्या मैफलीत कधी गळ्यातून येतो..

डोळ्यातल्या पावसाला, द्यावा ओंजळीत ठाव
बोटांनाहि पालवतो मग सांत्वनाचा भाव...


गळयातला झेलायला कान बनावेत राधा,
होते मनाला लगेच कशी मुरलीची बाधा


उभ्या शिवारामधून गडी आडवा पाळतो,
हूल देवून उगाच नको नकोसे छळतो..

ओल्या ओल्या हाका देतो कधी होवून वादळ,
तन मनी घोटाळते मग निराळी वर्दळ..


जरा कोरडे जगाया त्याला कैकदा टाळते
त्याची रिपरिप बाई मला उभ्याने जाळते..

अशा वेळीच सरळ मग पाऊस वेचावा,
तन माझे भिजवून मनामधून साचावा..


मग कोणता पाऊस आणि कोणते आपण...
दोघे मिळून भोगतो आकाशाचे राजेपण !!!


भाग्यश्री कुलकर्णी.

Madhura Kulkarni


मिलिंद कुंभारे


केदार मेहेंदळे

मग कोणता पाऊस आणि कोणते आपण...
दोघे मिळून भोगतो आकाशाचे राजेपण !!!



vishesh avadal

rudra



sweetsunita66

गगनातील अन नेत्रातील पावसात एक साम्य असते ,
अनावर झाले की ते अनिर्बंध वाहते
धैर्याचा बांध तुटून जातो कधीच
सर्व जग जलमयच झाल्यासारखे दिसते ............
                                                                     सुनिता नाड्गे [शेरकर ] ;)



ज्योती

मग कोणता पाऊस आणि कोणते आपण...
पळून जाते मी तोडून दावण.