भेट मला एकदाच.... अगदी अगदी अखेरचं....

Started by Madhura Kulkarni, June 19, 2013, 03:56:23 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

छान मधुराजी :)

आयुष्यात कधी कधी पोकळी जाणवते.....
भुतकाळातल्या आठवणीँची साखळी जाणवते.....
आपलं माणुस आपल्यापासुन दुर होताना.....
काळजातली जागा ही मोकळी जाणवते.....


sweetsunita66

आयुष्यात कधी कधी पोकळी जाणवते.....
भुतकाळातल्या आठवणीँची साखळी जाणवते.....
आपलं माणुस आपल्यापासुन दुर होताना.....
काळजातली जागा ही मोकळी जाणवते.....
:) ;)
भूतकाळाच्या आठवणीवर पुढे सरकतंय आयुष्य
वर्तमानाच्या  तालावर नाचतंय भविष्य
जीवनाचा फेरा हा कुणीच चुकवू शकत नाही
पिया तू त्यातही असा अंत पाही ? ,,,,,,,,,, सुनिता  ;)


मेघा

"भेटायचं होत एकदाच अगदी अगदी अखेरचं..!
तुझ्या सोबत पाहायचं होत एकदा जग बाहेरचं..!
पण तू आलाच नाहीस....
पण तू आलाच नाहीस...."


---------------------------------------

मधुरा, सांगते मी जे ते ऐक नीट.
कायेतल्या तुझ्या हॉर्मोन्सच्या प्रभावी
न आलेला "तो" भासतो आहे तुला
सकलगुणसंपन्न मदन, परी
"तो" आला नाही हेच तुझे
निःसंशय भाग्य असे.


मधुरा, सांगितले जे मी वरती
ते तू ऐक हं नीट.

Madhura Kulkarni

ओ फिलोसॉफर मेघाजी,

हि फक्त कविता आहे....अस काहीही नाहीये माझ्या खऱ्या आयुष्यात. आणि उगाचच मुक्ताफळे उधळू नका. :P :P :P

Çhèx Thakare

kavita chhan hoti pan madhura tai ek sangto mulana na khup kame astat tyamule tyala tyancha cls one la jast vel deta yet nye ani he karan mulina kadich patat nye pn te khare aste n te nehmi bolat astat  " pan tu alach nahis "

मेघा

मधुराजी, ही माझी फक्त "कविता" असे.
"कविता" नेमके म्हणायचे कधी
कुणाच्याही लिखाणाला,
मुद्द्दा असे हा अलाहिदा.

"अस काहीही नाहीये
माझ्या आयुष्यात खऱ्या.
आणि
नका उधळू उगाचच मुक्ताफळे."
वाटली खूप गम्मत वाचून ते.

sweetsunita66

अलाहिदा.मेघा ,याचा अर्थ नाही कळला !

Madhura Kulkarni

सुनिता, मला तर त्यांच्या म्हणण्यातील एका हि ओळीचा अर्थ कळलेला नाहीये....तुला फक्त एकंच शब्द अडलाय न? बाकीच कळल असेल तर मला नीट समजावून सांग.

चेक्स, अरे हि फक्त कविता आहे रे...खर नाहीये बाळ. तरी तुला कविता आवडल्या बद्दल धन्यवाद.