भेट मला एकदाच.... अगदी अगदी अखेरचं....

Started by Madhura Kulkarni, June 19, 2013, 03:56:23 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

अग मधुरा कळला तर मलाही नाही पण गोडा बरोबर कडू किवा तुरट खाल्ल्याने गोडी जास्त जाणवते नाही ?मग हे ही गोड करून घे ............  :)

मेघा


मधुरा,

विचारप्रधान कवितेतून कवी किंवा कवयित्री एक तर आपल्या स्वतःच्या आयुष्यातल्या घटनांसंबंधात नाही तर कल्पनेने दुसर्‍या कोणा (काल्पनिक) व्यक्तीच्या आयुष्यातल्या वास्तवतेला धरून असलेल्या घटनांसंबंधात विचार प्रकट करत असतात. "वास्तवतेला धरून असलेल्या" हे शब्द महत्त्वाचे आहेत.

"चेक्स, अरे ही फक्त कविता आहे रे...खरं नाहीये बाळ" असे तू त्या तरुणाच्या नोंदीच्या उत्तरादाखल लिहिलेस. तुझ्या आधल्या नोंदीत तू "ही फक्त कविता आहे....अस काहीही नाहीये माझ्या खऱ्या आयुष्यात" असे लिहिले होतेस.

मल काय म्हणायचे आहे ते सूज्ञ चट्कन्‌ जाणातीलच. तेव्हा अधिक विस्ताराची गरज नाही. हा पत्रव्यवहार मी इथे पूर्ण थांबवत आहे. तुझ्या कवितालिखाणात तुला मी सुयश चिंतिते.

टीप : "बाळ" हे चेक्सला उद्देशलेले संबोधन योग्य होते की अयोग्य ते चेक्सने ठरवायचे आहे; पण तो मुद्दा "अलाहिदा" --म्हणजे वेगळा-- आहे. ("अलाहिदा'' ह्या शब्दाचे मूळ "अलहदा" ह्या फारसी शब्दात आहे, आणि तो फारसी शब्द हिंदी भाषेत जसाच्या तसाच रूढ आहे; मराठी भाषेतही "अलाहिदा'' हा शब्द त्या जरा वेगळ्या रूपात अगदी रूढ आहे.)


Madhura Kulkarni

मेघा, मला अजूनही कळलेले नाही....असो, सुनिता, मला तुझे म्हणणे पटले.

सोना, धन्यवाद!

कवि - विजय सुर्यवंशी.

छान आहे चारोळी


आयुष्यात कधी कधी पोकळी जाणवते.....
भुतकाळातल्या आठवणीँची साखळी जाणवते.....
आपलं माणुस आपल्यापासुन दुर होताना.....
काळजातली जागा ही मोकळी जाणवते.....
:) ;)
भूतकाळाच्या आठवणीवर पुढे सरकतंय आयुष्य
वर्तमानाच्या  तालावर नाचतंय भविष्य
जीवनाचा फेरा हा कुणीच चुकवू शकत नाही
पिया तू त्यातही असा अंत पाही ? ,,,,,,,,,, सुनिता  ;)

sweetsunita66


vijaya kelkar

       मधुरा आणि सुनीता ...खूप छान चारोळी  लिहिता ...


sweetsunita66