चारोळी

Started by sweetsunita66, June 19, 2013, 10:45:44 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

प्रेमा साठी रडणे माझे ,प्रेमा साठी हसणे ,
जीवनी जर प्रेम नसले ,कशासाठी हे जगणे .
कुणाच्या तरी  हृदयात जागा असावी आपली ,
ही कल्पनाच मनाला हळुवार करी गुदगुली .
हृदयी बसून प्रियकराच्या स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झुलावे .,
प्रेमाचाच  बहर हा,ह्याने  जीवन भर बहरून राहावे .
                                                            सुनिता नाड्गे [शेरकर ] ;) ;)


rudra


मिलिंद कुंभारे


sweetsunita66

thanks milind,rudra,n prashant.thanks a lot ;) :)

सुषमा

ना, गडे, सुनीता, ही चारोळी;
रचलीस तू साहोळी.
असे आगळी परी तुझी साहोळी.
कळविण्या ते मी रचली ही चारोळी.

sweetsunita66

ना, गडे, सुनीता, ही चारोळी;
रचलीस तू साहोळी.
असे आगळी परी तुझी साहोळी.
कळविण्या ते मी रचली ही चारोळी.
>:( :Dधन्यवाद  कसे मी देऊ तुला ,
माझ्या रचनेचा   नामकरण झाला ,
अप्रतिम हे शब्द तुझे
वाचुनी मन भारावले माझे thanks  sushama  :D

sweetsunita66

कोठे पोस्ट करू ते पण सुचवा ना ,,,,,,,,,,, :) ;)

सुषमा

गोड, गडे, सुनीता नाड्‌गे, 
"नामकरण" शब्द पुल्लिंगी नगे, अगे.
सुचवते फेरफरक तेव्हा यमकार्थ असे
करू आपण "नामकरणा"चे बारसे.

..............................................

"धन्यवाद तुला मी देऊ कसे?
रचनेचे माझ्या केलेस, बये, तू बारसे.
अप्रतिम हे शब्द तुझे
वाचुनी भारावले मन माझे!"

---------------------------------------

आणि गोड, गडे, सुनीता नाड्‌गे, 

चारोळी, साहोळी, आठोळी, दाहोळी,
नव्हते असले काही माझ्या आजोळी
उठल्यानंतर अगदी भल्या सकाळी
आजी-आजोबा असत म्हणत भूपाळी --
.
.
.
घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला ।
उठीं लवकरि वनमाळी ! उदयाचळीं मित्र आला ॥ ध्रु ॥
सायंकाळी एके मेळीं द्विजगण अवघे वृक्षीं ।
अरुणोदय होतांचि उडाले चरावया पक्षी ।
अघमर्षणादि करुनि तापसी तपाचरणदक्षी ।
प्रभातकाळीं उठुनि कापडी तीर्थपंथ लक्षी ।
करुनि सडासंमार्जन गोपी कुंभ घेउनि कुक्षीं ।
यमुनाजळासी जाती मुकुंदा ! दध्योदन भक्षीं ॥
मुक्तता होऊं पाहे । कमळिणीपासुनियां भ्रमरा ॥
पूर्वदिशे मुख धुतलें । होतसे नाश तिमिरा ॥
उठिं लवकरि गोविंदा । सांवळ्या नंदकुमारा ।
मुखप्रक्षालन करीं अंगिकारी भाकर -काला ॥ १ ॥
घरोघरी दीप अखंड त्यांच्या सरसावुनि वाती ।
गीत गाति सप्रेमें गोपी सदना येति जाती ॥
प्रवर्तोनि गृहकर्मी रंगावळि घालूं पाहती ।
आनंदकंदा ! प्रभात झाली उठ सरली राती ॥
काढीं धार क्षीरपात्र घेउनि धेनू हंबरती ।
द्वारी उभे गोपाळ तुजला हांक मारुनि बाहती ॥
हे सुमनहार कंठी । घालि या गुंजमाळा ।
हाती वेत्रकाष्ठ बरवें । कांबळा घेइं काळा ॥
ममात्मजा मधुसूदना । ह्रुषीकेशी जगत्पाळा ।
हंबरताति वांसरे हरि धेनुस्तन-पानाला ॥ २ ॥
प्रातः स्नाने करुनि गोपिका अलंकार नटती ।
कुंकुमादि चर्चुनी मंथनालागिं आरंभिती ।
प्रेमभरित अंतरांत वदनीं नामावळि गाती ।
अर्घ्यदान देउनियां द्विजजन देवार्चन करिती ॥
नेमनिष्ठ वैष्णव ते विष्णु-पूजा समर्पिती
स्मार्त शिवार्चनसक्त, शक्तितें शाक्त आराधिती ॥
ऋषिगण आश्रमवासी । जे कां निरंजनी धाले ।
अरुनोदय होतांचि । आपुले ध्यानिं मग्न झाले ॥
पंचपंच-उषःकालीं । रविचक्र निघों आलें ।
येवढा वेळ निजलासिम्हणुनि हरि कळेल नंदाला ॥ ३ ॥
विद्यार्थी विद्याभ्यासास्तव सादर गुरुपायी ।
अध्यापन गुरु करिति शिष्यही अध्यायना उदयीं ॥
याज्ञिकजन कुंडांत आहुती टाकिताति पाहीं ।
रविप्रभा पडुनियां उजळल्या शुद्ध दिशा दाही ॥
हे माझे सावंळे पाडसे उठिं कृष्णाबाई ।
सिद्ध सवें बळिराम घेउनि गोधनें वना जाई ॥
मुनिजनमानसहंसा । गोपीमनःकमलभृंगा ।
मुरहर पंकजपाणी । पद्मनाम श्रीरंगा ॥
शकटांतक सर्वेशा । हे हरि प्रतापतुंगा ।
कोटिरवींहुनि तेज आगळें तुझिया वदनाला
होनाजी बाळा नित्य ध्यातसे ह्रुदयि नाममाळा ॥ ४ ॥

sweetsunita66

":) :) अप्रतिम ये शब्द भांडार तुम्हारा
       देगा क्या मेरी कविता को सहारा
       अगर  तू मेरी द्रोणाचार्य   बनेगी
       तो मैं तेरी एकलव्य बनुंगी  ;) ;)