रावणाचा प्रणय

Started by sweetsunita66, July 08, 2013, 04:17:05 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

 :)मान्दोदरीशी हितगुज जेव्हा करत असेल रावण ,
एक सोडून नऊ तोंडं कशी राहत असतील मुके ,
अन दाशाननाच्या प्रणय निवेदनाला कशी सरसावून जाईल ती,
जेव्हा एका  ऐवजी दहा  चक्षु लवत  ;)असतील फुके । ............ सुनिता :)

मीना

मंद + उदरी => मंदोदरी => मऊमऊ उदराची रमणी
घेई मुके दशाननाच्या दश ओष्ठांचे कामुक ती कामिनी
एकामागून एक ओळीने लागता त्यांची वर्णी
मूकपणे पुरवती ओष्ठ दश धिम्मेपणी मागणी!

अभिलाष


वात्रटिका असे त्राटिका नका करू अशी फुका कुणी टीका
कुंभकर्णाचे असे स्त्रीरूप ते गंमतीचे, जाणा जन, बरे का!

rudra


मिलिंद कुंभारे



केदार मेहेंदळे


sweetsunita66

सगळ्यांना मनापासून धन्यवाद ,एक प्रयत्न होता ! :) :D :D

कवि - विजय सुर्यवंशी.


:)मान्दोदरीशी हितगुज जेव्हा करत असेल रावण ,
एक सोडून नऊ तोंडं कशी राहत असतील मुके ,
अन दाशाननाच्या प्रणय निवेदनाला कशी सरसावून जाईल ती,
जेव्हा एका  ऐवजी दहा  चक्षु लवत  ;)असतील फुके । ............ सुनिता :)
.
.
बिच्चारा रावण..  :D :D
.
.
वाचोनिया आपण मांडलेली...
रावणाची अशी कथा...
खरंच असेल मग...
मंदोदरीची व्यथा...
.
.
व्यतित करोनी वेळ...
एक मुखापाशी...
उरलेली ती हतबल मुखे...
हितगुज करत असतील कुणाशी...
.
.
पाहुनिया त्या दोहोंची ही व्यथा...
वाटे मंदोदरीही दशमुखी असावी...
शिवःवर त्या रावणाला मग...
नच् गरज कुणाची पडावी...  :D :D
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
    (यांत्रिकी अभियंता)

sweetsunita66

धन्यवाद!! एक प्रयत्न होता विजय !  :) :)