Re: चारोळी

Started by sweetsunita66, September 21, 2013, 09:31:30 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

हळवे हे मन माझे
नाजूकश्या  फुला परी
दुखा सारखे सुखातही
आसवांची साथ अंतरी  :)सुनिता :)

Çhèx Thakare


vijaya kelkar

अगदी खर  आहे.......

sweetsunita66

धन्यवाद चेक्स आणि विजया !तुम्ही माझे शब्द गोड करून घेतल्या बद्दल ! :) :) :) :)

sweetsunita66


कवि - विजय सुर्यवंशी.

#5

हळवे हे मन माझे
नाजूकश्या  फुला परी
दुखा सारखे सुखातही
आसवांची साथ अंतरी  :)सुनिता :)
.
.
.
.
.
छान :)
.
.
.



फुलापरी मन हे तुझे,
हळवे असावे...
शब्दांच्या ओढीने,
काव्य तुझे  फुलावे...

अंतरी लपलेले मज,
गुज ते मनीचे कळावे...
अनं अबोल त्या डोळ्यामधुनी,
मृगजळ हर्षाचे मिळावे...
.
.
.विजय सुर्यवंशी.
(यांत्रिकी अभियंता

sweetsunita66

 :) :) :) वाह वाह विजय फारच छान !!बऱ्याच दिवसा नंतर ओळी वाचायला मिळाल्या .धन्यवाद !!!! :) :) :) :)

sweetsunita66

#7
फुलापरी मन हे तुझे,
हळवे असावे...
शब्दांच्या ओढीने,
काव्य तुझे  फुलावे...

अंतरी लपलेले मज,
गुज ते मनीचे कळावे...
अनं अबोल त्या डोळ्यामधुनी,
मृगजळ हर्षाचे मिळावे...

आत्ता माझी बारी .......

मन हळवे असले तरी
मी हिंदवी मर्दानी 
प्रेमासाठी काही पण
पण दुष्टास पाजेल पाणी
.
.
अंतरी लपलेले गुज
कुणा तरी सांगावे
अबोल त्या नयनातून
निशब्द भाव कळावे ,
.
.
शब्द माझे परिसा परी
झिजून गंध पसरविते
कुणाच्या तरी घायाळ मनी
जरi का फुंकर घालते
.
.

ओळखल्यात  भावना
कौशल्य हे तुमचे बरे
कवी उगीच नव्हे तुम्ही
साहित्याचेच  हिरे खरे ....
       
                              सुनिता 


कवि - विजय सुर्यवंशी.


:) :) :) वाह वाह विजय फारच छान !!बऱ्याच दिवसा नंतर ओळी वाचायला मिळाल्या .धन्यवाद !!!! :) :) :) :)
.
.
.
.
आभारी  आहे सुनिताजी
.
.
:)

sweetsunita66