चारोळी

Started by sweetsunita66, January 09, 2014, 09:46:53 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66


छान आहेत ग्रेस यांच्या ओळी !त्या वरून मला ही कविता सुचली . बघा कशी वाटते !!!

कवि - विजय सुर्यवंशी.


:) :)
देवकीने जन्म दिला अन
यशोदा झाली कृष्ण माई
देवकीची समर्पण भावना
यशोदेच्या ठाई नाही
दूर असो वा मनी वसो
देवकीला एकच ध्यास
सुरक्षित अन सुखी असू दे
श्री  विष्णू चरणी आरास
हृदयाच्या अनुगमन स्पंदनी
सावळा नटखट कान्हा 
डोळ्यातुनी गंगा यमुना
अन पदरातून वाहे पान्हा ...। सुनिता  :) :)
                                       १२जानेवारी २०१४
...
.
.
.


छान आहे कविता...
..
.
.
जन्माचं काय ते,
अप्रुप मानावं...
प्रतिपाळापुढे त्या देवकीच्या,
यशोदेला कसं आणावं....
.
.
जपण्या त्या तान्ह्याला,
यशोदेने मातृत्वाचा मोह सोडला...
कंसाच्या त्या भयामुळे,
कान्हाला धाडिलं गोकुळाला...
.
.
दायी अनं माईच्या ममतेत,
उगाच का फरक करावा...
निरागस त्या नयनात,
अवघा गोकुळ उरावा...
.
.
नसता ही यशोदा,
काहीच उरले नसते...
दोन्ही त्या माईविंना,
गोकुळ बहरले नसते....
.
.
  विजय सुर्यवंशी.
(यांत्रिकी अभियंता)‌

sweetsunita66

छान समीक्षा!!!

देवकी अन यशोदा
कान्हा प्रेमात रमल्या
श्री कृष्ण रुपी होऊन
स्वत्व सारे विसरल्या
दोन्ही ममताचा सार
होई मातृ ऋण भार
उतराई होण्या खरे 
नारायण अवतार ...... सुनिता

कवि - विजय सुर्यवंशी.

छान उत्तर दिलंत.......................... :) :) :)

कवि - विजय सुर्यवंशी.

ठिक आहे आता दुसरा विषय घेउया.......

sweetsunita66

आता विषय तुम्ही सुचवा !!!

कवि - विजय सुर्यवंशी.

चला मग मैत्रिव्रर बोलु काही............
.
.
.


sweetsunita66

मैत्री मैत्री मैत्री
आनंदाची खात्री
राग द्वेषाला
कायमची कात्री
प्रेम विश्वासाचे 
बीज अंकुरण
मैत्रीत देवत्वाचे स्फुरण
नसे अपेक्षा परतफेडीची  .
नसे लालच देण्या घेण्याची 
हे विश्व असे शुद्ध अन सात्विक
म्हणूनच मैत्री रक्त संबंधाहून आत्मिक ...। सुनिता     
                                                             १९जानेवारी २०१४

sweetsunita66

काय झालं मैत्रीवर बोलू काही म्हणून चुपच का???काहीच पोस्ट नाही ???? :(

शिवाजी सांगळे

बरं वाटलं कृष्ण कौतुक, त्या नंतर मैत्रीच आमंत्रण,
येते मजा वाचायला, अन्न लिहायला स्फुरण !


शिव......
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९