चारोळी

Started by sweetsunita66, January 09, 2014, 09:46:53 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

 :) सिमेंट लोहाच्या जंगलात भावना झाल्या बेजार
झाडांच्या कत्तलीने निसर्ग रडे जार जार

आता कोठे निंबोणी अन लपलेला तो चांदोबा
तथाकथित प्रगतीत जीवनाचा झाला खेळ खंडोबा...... सुनिता  :'(

कवि - विजय सुर्यवंशी.


:) सिमेंट लोहाच्या जंगलात भावना झाल्या बेजार
झाडांच्या कत्तलीने निसर्ग रडे जार जार

आता कोठे निंबोणी अन लपलेला तो चांदोबा
तथाकथित प्रगतीत जीवनाचा झाला खेळ खंडोबा...... सुनिता  :'(
.
.
.
.
.
छान :D :D :D :D
.
.
त्या सर्व चिमुकल्यांकरता....
.
.


कल्लोळ हा भावनांचा,
ईमारतींच्या या जगती....
उदास या अबोल नजरा,
आता चांदोबाला शोधती....
.
.
व्यस्त या जिवनी,
बाबा आता भेटतंच नाही....
आईची मायेची कुशी,
खरंच आता मिळतंच नाही....
.
.
ओस पडलंय आता ते,
निंबोणीच झाड...
जाहिरातीच्या या युगी,
होते फक्त complan ने वाढ....
.
.
चिऊ अनं काऊच्या गोष्टीही,
आता कानी पडंत नाहीत....
अ‍नं प्रेमळ धाकाने,
आता मुलही रडंत नाहीत....
.
.
भिती आहे त्यांना फक्त,
प्रेम आई बाबांचं हरवण्याची....
अ‍नं मर्मबंधातलं ते नातं,
कॉंक्रिटच्या जगी विरण्याची....
.
.
विजय सुर्यवंशी.
(यांत्रिकी अ‍ भियंता)


sweetsunita66

 :) :) वा वा !!!सुरेख...खुप बर वाटलं तुम्हाला जुन्या फॉर्म मध्ये आलेलं बघून . असेच नव नवीन पोस्ट करत राहा !!!! :) :) :)

sweetsunita66

या दिखावटी जगात
भावना मृत झाल्या
आता कुठे ती माया
चक्षु कडा त्या ओल्या
नाते गोते वृथाची
अन परंपरा पृथक
दिसती आता  जगी या
नुसते जीव घेणे नाटक
कोमल  प्रेमळ भावनांना
पोखरले  कसे उदळीने 
जगी कुठे, लोपला  हो
प्रेम झऱ्याचे खळखळने
अंतरंगीचा  प्रेमळ प्रवाह
असा का हो परका झाला
की लेकरू निश्छल मायेला
या जगी पोरका झाला
विदेशी जीवघेणे  खुळे अनुकरण
आता कधी हो संपुष्टात येणार
की ऱ्हास स्वाभिमानी संस्कृतीचा
'"भारतीस '"समूळ पंगू करणार
करू एवढीच आशा
येणाऱ्या उषक्काली 
जागे होतील नशेतून
असता हाती हि खेळी .......
                                  सुनिता
                                        १०जानेवारी २०१४ :)

कवि - विजय सुर्यवंशी.


:) :) वा वा !!!सुरेख...खुप बर वाटलं तुम्हाला जुन्या फॉर्म मध्ये आलेलं बघून . असेच नव नवीन पोस्ट करत राहा !!!! :) :) :)
.
.
.
.
धन्यवाद सुनिताजी....... :)
.
.
.
चाललो आम्ही ज्या वाटेने,
ती तर आपणंच दाविली....
चारोळीच्या आपल्या वृक्षामागे,
आमची केवळ प्रतिक्रीयांची सावली....
.
.
विषयांस फोडुनी वाचा,
सुरुवात तर तुम्हीच केली....
चारोळीच्या या प्रवाही,
आम्ही फक्त साथ दिली....
.
.
  विजय सुर्यवंशी.
(यांत्रिकी अभियंता)

sweetsunita66

 :) :) :D साहित्त्याची सेवा कशी एकट्याने होणार
सर्वांच्याच  नवं कवितांनी हे झाड बहरणार
एकमेका साह्य करून अवघे धरू सुपंथ
षडाक्षरी नसली तरी मनी नसावी खंत
लय मात्रा सर्व  सोडून मुक्तछंदात लिहावे
सरळ सोप्या कवितेला मनोमनी जगावे
मनातील भावनांना शब्दमाळेत ओवावे
बाकी सर्व शुभम भवतु जयकार मुखी वदावे ...... सुनिता  :)
   :) :)      keep posting  :) :)
          thanks again .यहां सब एक दुसरे कि प्रेरणा है .  :)

कवि - विजय सुर्यवंशी.


:) :) :D साहित्त्याची सेवा कशी एकट्याने होणार
सर्वांच्याच  नवं कवितांनी हे झाड बहरणार
एकमेका साह्य करून अवघे धरू सुपंथ
षडाक्षरी नसली तरी मनी नसावी खंत
लय मात्रा सर्व  सोडून मुक्तछंदात लिहावे
सरळ सोप्या कवितेला मनोमनी जगावे
मनातील भावनांना शब्दमाळेत ओवावे
बाकी सर्व शुभम भवतु जयकार मुखी वदावे ...... सुनिता  :)
   :) :)      keep posting  :) :)
          thanks again .यहां सब एक दुसरे कि प्रेरणा है .  :)
.
.
.
.
मुक्तछंदाचा गंध तो.
मनाला नेहमी प्रिय असे....
भावनेचा मेळा तो,
मुक्तछंदात वसे....
.
.
शब्दांच्या या जगी,
नात्यांची उणिव नसे....
यमकछंदाच्या या युगि,
स्वप्न भासांचे दिसे...
.
.
विजय सुर्यवंशी.
यांत्रिकी अभियंता

sweetsunita66

सुंदर कविता विजय !!! :)
   आता दुसरा विषय 'आई ' :)

:) :) आई  :) :)

आई म्हणजे आपल्यातील ईश्वर !!
आई म्हणजे अबोल अथांग प्रेमाचा सागर !!
आई म्हणजे घायाळ मनावर हळुवार फुंकर !!
आई म्हणजे स्वत्व विसरून पिल्लांचे जीवन जगणारी जबाबदार शिखर !!
आई म्हणजे स्वमुखातून ग्रास काढून पिल्लांना भरवणारा मायेचा पाझर !!
आई म्हणजे आपल्या सर्व पिल्लांना हृदयाच्या कप्प्यात जपणारी उबदार पाखर !!
आई म्हणजे आई म्हणजे आईच असते कधी वज्राहूनही कठीण तर कधी मेणाहून मऊ असते !!
कधी जमलेला शीत पहाडी बर्फ तर कधी झरझर वाहणारा सुंदर मनमोहक सहस्त्र धारा निर्झरा असते !!
आपल्या सर्वां साठी आपल्या आई पेक्षा दुसर कुणीही सुदर्शना नसते
कारण आई म्हणजे आई म्हणजे आईच असते !!!!!
सुनिता :) :) :)


कवि - विजय सुर्यवंशी.

यावर आता मला कवि ग्रेस यांच्या काही ओळी आठवत आहेत.....
.
.
.
"आई माझी कृष्णकळीतील,
विष विसरला कंस....
अनं देवकीच्या ही पुढे निघाला,
शुभ्र पांढरा हंस......"    :) :) :)

sweetsunita66

 :) :)
देवकीने जन्म दिला अन
यशोदा झाली कृष्ण माई
देवकीची समर्पण भावना
यशोदेच्या ठाई नाही
दूर असो वा मनी वसो
देवकीला एकच ध्यास
सुरक्षित अन सुखी असू दे
श्री  विष्णू चरणी आरास
हृदयाच्या अनुगमन स्पंदनी
सावळा नटखट कान्हा 
डोळ्यातुनी गंगा यमुना
अन पदरातून वाहे पान्हा ...। सुनिता  :) :)
                                       १२जानेवारी २०१४