पीजेचा कहर

Started by Siddhesh Baji, January 21, 2010, 08:30:20 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji


बंडू : ए ए ए चंदू मी किनई उद्या तुला 'फोन' करणार आहे.

चंदू : हो कर की रे. पण परवा परत 'माणूस' करशील ना?

Siddhesh Baji

#1
जॉन : हेय. देअर... दॅटस मोती... मोती यू. यू. यू.

मोती कुत्रा : मी मी मी???

जॉन : वॉव...धीस इंडियन डॉग कॅन टॉक अॅण्ड अण्डरस्टॅण्ड लँग्वेज. (बिस्किट देत) टेक मोती टेक.
....

आणि मोती जाऊन भिंतीला टेकला.

Siddhesh Baji

 बंडोपंत : ओ साहेब माझ्या बबडी गायीने माझ्या मोबाइलमधलं सीमकार्डच गिळलं आणि पळून गेली बघा ती. आता ती कुठे तरी फिरत सुटली असणार बगा.

कस्टम केअर : मग तुम्हाला काय मदत हवीय माझ्याकडून

बंडोपंत : म्हंजी मला एवढंच विचारायचंय की ती बबडी गाय इथे तिथे फिरतेय तर तिला रोमिंग चाजेर्स तर नाय ना ओ लागणार?

Siddhesh Baji

डॉक्टर : तुम्ही दिलेला माझ्या फीचा चेक परत आलाय.


पेशंट : ... आणि माझा आर्थ्रायटीसही परत आलाय.

Rahul Kumbhar

kai re sidhhu .itke PJ kuthun aantos??

Siddhesh Baji

१. एका एकादशीला सगळे प्राणी उपवास करतात. मग, देवाची पूजा करण्यासाठी चालत चालत मंदिरात जातात. पण, कोंबडी जात नाही. का?
>कारण, उपवासाला कोंबडी चालत नाही.

२.देवभोळ्या सिंधी माणसाचं नाव काय?
>भगवानदास गॉडवाणी

३. सिंधी चित्रकार?
>सदारंगानी!

४. पहिल्या मजल्यावरून पडलेल्या सिंधी माणसाला काय म्हणतात?
> थंडानी

५. दहाव्या मजल्यावरून कोसळलेल्याला...?
> क्रिपलानी

६. तो २५व्या मजल्यावरून कोसळला तर...?
> मरजानी

७. कम्युनिस्ट सिंधी?
>कार्ल लालवाणी


८. सिंधी शेफ?
>पापडमल कुकरेजा

९. सिंधी इलेक्ट्रिशियन
>व्होल्टराम बिजलानी

१०. फॅशनेबल सिंधी?
>जोगिओ अरमानी

११. सिंधी दूधवाला?
>गोपाल दुधेजा

१२. शूर शिपाई?
>हिरू सिपाहीमालानी

१३. सिंधी पेस्ट कंट्रोलवाला?
>खटमल मारवानी

१४. सिंधी आगीचा बंब?
>बंबानी

१५. सिंधी पोस्टमन?
>मेलवानी

१६. विसरभोळा सिंधी?
>बुलो भूलचंदानी

१७. सिंधी सरकारी कर्मचारी?
>चायपानी!!!!



Siddhesh Baji


    घड्याळात   १३ ठोके   पडल्यावर   कोणती वेळ   असते?   

    घड्याळ   दुरुस्त   करण्याची.   

Siddhesh Baji


अनुपम खेरला वर्ष संपताना मुलगी झाली तर तिचं नाव काय असेल?

वर्षा . अ. खेर

Siddhesh Baji


दोन चिमण्या असतात. त्यातली एक म्हणते चिऊ. तर दुसरी काहीच म्हणत नाही. का?

कारण, दुसरी कारखान्याची चिमणी असते.

Siddhesh Baji

रावणाच्या लंकेला सोन्याची लंका का म्हणतात?

कारण त्याचे आई-वडील त्याला प्रेमाने सोन्या म्हणायचे.