प्रेम...

Started by गणेश म. तायडे, October 06, 2017, 10:14:47 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

खरचं खूप लहान शब्द आहे ना प्रेम... पण सार काही इथेच येऊन थांबलेलं आहे, प्रेम करणारे करतात पण खरं प्रेम काय हे कधी कुणी जाणुनी घेतलं का? तो माझाच किंवा ती माझीच या भावणे पलीकडे जे आहे ते खरे प्रेम... आज सोबत म्हणून जिवलगा प्रियकरा... नंतर मनात द्वेष... प्रेम म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत नेहमी तिला किंवा त्याला सुखात पाहणे, आठवण येता गाली हसू येणे आणि अलगद न कळता चटकन डोळ्याची कोर ओली होणे यालाच प्रेम म्हणावे... जगावे, मरावे परी मनी प्रेम जपावे...

तुटून जातील चांदणे नभिचे
ऐकुनी हाक माझ्या मनीचे
रोखून जाईल हि धरा
पाहुनी क्लेश माझ्या उरीचे
संतप्त होईल तो चंद्र हि
गळुनी जातील पाकळ्या कळीचे
रुसून जातील चेहरे हसरे
निःशब्द होतील भाव बोलके
तरी ही प्रिये...
मी तुझाच राहील सदा
वादा आहे धावेल ऐकुनी तुला
नको समजूस गैर तू मज
परका जरी मी, मी आहे तुझा
काढुनी टाक मज तू श्वासातून
झटकून टाक त्या आठवणी
विसरून जा तू मला सदाची
पुसूणी काढ ती ओली पापणी
तू रहा सुखी, सुख मिळेल तुला
नको करु काळजी तू
होईल त्रास आणखी तुला
प्रेम केले मी तुला जिवलगा
स्वार्थ नव्हता कधीच मनी दडलेला
भाव निर्मळ आहेत मनीचे
पाहण्या तुज सदा आनंदी
प्राण हा माझा आसुसलेला...

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11

sangram jathar

ganesh sir...kavita must ahe

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

प्रियंका बगाडे.

येता तु या जगी
आनंद मज झाला..
मुलगी म्हणूनी जन्म जेव्हा
तुझा हा झाला....

तूझ्या येण्याने
मज नवे नाते मिळाले..
तुजला पाहुनी मज
गीत हे मिळाले.......

घेता मिठीत तुज
नवी जानीव होई..
मावशी असुनही मी तूझी
तू प्रेम मज आई चे देई........

गणेश म. तायडे

छान लिहिता तुम्ही पण

प्रियंका

शब्द स्वरुपी आलेल्या फुलांना..
शब्दांनीच उपमा दयावी.....

हाती आलेल्या गुलाबाने...
नेहमी प्रेमाची आठवण तूला करून दयावी.....

बरसता पाऊस तूला माझी कमी जानवावी..
घेऊन मिठीत तूझ्या आठवणीने नवी जागा करावी....

कवितेच्या पानावर शब्दांची गर्दी व्हावी...
लिहिता कविता मज फक्त तूझी आठवण यावी....
फक्त तूझी आठवण यावी......

गणेश म. तायडे

खूप छान...

- गणेश म. तायडे
8928236122

प्रियंका

नशीब किती खराब म्हणाव...
हृदयाच्या सर्वात जवळच्या व्यक्तीला मात्र
दूर राहून Photo मध्ये पाहव......💖

नशीब किती खराब म्हणाव...
समोर बसून बोलता येत नाही म्हणून
Phone Call करून तास न तास बोलाव.....💖

नशीब किती खराब म्हणाव...
Phone वर बोलत राहणारी ती मात्र
समोर मी येता ..
लाजून तीने गप्प बसाव.......😍

नशीब किती खराब म्हणाव...💖

गणेश म. तायडे


प्रियंका