कवी नारायण सुर्वे यांची एक खूप छान कविता..

Started by pomadon, July 11, 2010, 06:31:45 PM

Previous topic - Next topic

pomadon


कवी नारायण सुर्वे यांची एक खूप छान कविता..

हंबरून वासराले चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय

आयाबाया सांगत व्हत्या व्हतो जवा तान्हा
दुस्काळात मायेच्या माजे आटला व्हता पान्हा
पिठामंदी पानी टाकून पाजत जाय
तवा मले पिठामंदी दिसती माझी माय

कन्या-काट्या येचायाला माय जाई रानी
पायात नसे वहान तिच्या फिरे अनवानी
काट्याकुट्यालाही तिचं नसे पाय
तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय

बाप माझा रोज लावी मायच्या मागं टुमनं
बास झालं शिक्षान आता घेऊ दे हाती काम
शिकुनश्यानं कुठं मोठ्ठा मास्तर हुनार हायं
तवा मले मास्तरमंदी दिसतो माझी माय

दारु पिऊन मायेले मारी जवा माझा बाप
थरथर कापे आन लागे तिले धाप
कसायाच्या दावनीला बांधली जशी गाय
तवा मले गायीमंदी दिसती माझी माय

बोलता बोलता येकदा तिच्या डोळा आलं पानी
सांग म्हने राजा तुझी कवा दिसंल रानी
भरल्या डोल्यान कवा पाहील दुधावरची साय
तवा मले सायीमंदी दिसती माझी माय

म्हनून म्हंतो आनंदानं भरावी तुझी वटी
पुना येकदा जलम घ्यावा तुजे पोटी
तुझ्या चरनी ठेवून माया धरावं तुझं पाय
तवा मले पायामंदी दिसती माझी माय‍


gaurig




:) ... विजेंद्र ढगे ... :)





nc

महागाईचे सगळे बहाणे

सहन करणे भाग असायचे

महागला तो gas भयंकर

जणू चुलीने डोळे मिटले

कशी मिळेल भाजी भाकर

भुकेने आतडे तुटले

तेल रॉकेल नसता घरी

लाकडे शेण्या की करी

महागाई पक्की सठेबाज

ती तर डबल भाव खायची

डबल भाव वाढतच

टंचाई नाव द्यायची

कशी करावी साजरी सणवारी

मनी खंत वाटुनी डोळ्यात येई पाणी

पेट्रोल भडकले डिसेल भडकले

गाडी कुठली त्वो व्हीलर हि fashion झाली

महागयीचा खर्या रेखा

मला कळून चुकल्या होत्या

मुले म्हणती फिरायला जायू

मजबूर मी कसे कुठे मी नेऊ

कशी मिळेल शांती जीवाला

कौन आवारे ह्या महागायीला


walkoligopichand@yahoo.in