कारण ती आलीच नाही Part- 2

Started by Rupesh Naik, November 27, 2011, 01:47:46 AM

Previous topic - Next topic

Rupesh Naik

This Poem is Second part of My first post
"कारण ती आलीच नाही".
http://marathikavita.co.in/index.php/topic,6563.0.html


मी नाही येऊ शकले...
              - रुपेश नाईक

उचललेली पावले जागीच थिजली
हाक देखील मग हवेत विरली
अखेरचे आता त्राण ही सरले
आणि मग मी नाही येऊ शकले

भेटीच्या ओढीची ओढाताण झाली
देव देवतांना देखील गार्हाण धरली
नियतीच्या खेळत मात्र मी सपशेल हरले
आणि मग मी नाही येऊ शकले

आपल्या प्रेमाचा प्रश्न गहन फार झाला
आप्तांचाच सोस मग सहन नाही झाला
असह्यापारी अंथरूणच  मी धरले
आणि मग मी नाही येऊ शकले

आपला प्रवास स्मृती पटलावर चालू होता
तुझा पहिला गुलाब जवळच विसावला होता
गुलाबाचा रंग फिका वाटत होता
thermometer देखील उच्चांक गाठत होता

तरीही वाटत होते तुझ्या समीप यावे
पुन्हा एकदा तुला डोळे भरून पाहावे
उगाचच रुसावे अन भांडावे तुझ्याशी
मनातील गुज सारे मांडावे  तुझ्याशी

पण वेळ थांबत नाही, क्षण मागे फिरत नाही
श्वासांचं गणित काही कधीच जमत नाही
शेवटचा श्वासदेखील तुझंच नाव घेऊन गेला
पण तो क्षण तरीही अधूराच वाटला...

पावलोपावली होते मी तुझ्या मागे
तुझ्या प्रत्येक श्वासात... त्या निःशब्द जागे
तू आभाळाकडे नजर टाकशील जराशी
तिथेच उमटलेली असेल माझीच छाया हलकीशी..

जग पुढे जाईल, दिवस सरतील
काळजाच्या जखमा हळूहळू भरतील
पण एकटेपणाच्या शांत रात्री नक्की येईल विचारांत मी
जेव्हा अश्रूंच्या किनाऱ्यावर तू शोधशील पुन्हा "ती"

पण कधी उगाच एखादा वारा स्पर्शून जाईल
तेव्हा समज... मी तुझ्या वेदनांना फुंकर मारून जाईन
कारण तुला हलकं वाटावं, तुझं दुःख ओसरावं
आणि माझ्या अनुपस्थितीतही, मी तुझ्याजवळच असावं..

आणि हो म्हणूनच...तेव्हा मी नाही आले, पण हरवलेही नाही
तुझ्या आठवणीत, तुझ्या शब्दांत... मी अजूनही baki आहे काही..
तुझ्या हसण्यात, तुझ्या अश्रूंमध्ये दरवळते
प्रेम मरणार नाही कधीच — त्याच प्रेमात मी आजही जिवंतपणे वसते..



तुझ्या हृदयात... मी कायमचीच विसावले आहे...

MK ADMIN

gr8888
me 1st kavita edit karun tyaat ya part 2 chi link takat ahe..

केदार मेहेंदळे

khup chan...... pudhil part -3 chi vat pahatoy...........



sia

really very nice ..punha punha vachavishi vatte.tu khup ch chan lihtos.
true wrttng n true love.

Rupesh Naik