कविता सुचतात तरी कश्या

Started by हर्षद कुंभार, January 21, 2012, 07:28:05 PM

Previous topic - Next topic

swara

माझ्या  मनातल्या 
भावना जणू
फ़क्त माझ्या
कवितानाच समजतात

न सांगता 
न बोलता
अगदी हव्या तश्या
कागदावर उतरतात

जेव्हा मला वाटते
जे मला सुचते
अगदी तंतोतंत
जुळतात

जे सांगायच असत
जे बोलायाच असत
सगळ  आधीच
ओळखून जातात

माझ्या कविता .............


Kalpesh Deore

माझ्या  मनातल्या
भावना जणू
फ़क्त माझ्या
कवितानाच समजतात

न सांगता
न बोलता
अगदी हव्या तश्या
कागदावर उतरतात

khupach chhan...

swara

thanks kalpeshji  :)

msguvhade@gmail.com

भावनेची भरती आठवणेच्या सागराला येते तेव्हा सुचते कवीता
प्रितीच पाखरु प्राजेताच्या फुलावर बसतेना तेव्हा सुचते कविता..M.G

Mandar Bapat

कविता म्हणजे दुःख ,कविता म्हणजेच सुख

मनातील भावनेला वाचा फोडणार ते असत मुख

कविता म्हणजे विचारांचा असतो रचनात्मक मेळ

भावनांना चालबद्ध करण्याचा हा सारा  कवितेचा खेळ  ...


प्रेम कविता तर फुलाप्रमाणे अलगद असतात

तुझा मी अन माझी तू पेक्षा वेगळ्या काही नसतात

डोळ्यापासून नखाला चंद्राच्या उपमा साऱ्या

प्रेयसी वर जळू  लागतात चंद्राच्या चांदण्या बिचाऱ्या ......


व्यक्ती जवळ येतात अन तेवढ्याच दूर जातात

दुख मात्र सारेच  सहन करत असतात ...

कोणी मनातला राग ,दुख समोरच्याला  बोलतो तर

कोणी फक्त कागदावर दुख मांडतो त्यालाच विरह कविता म्हणतो...


मनातला भाव कागदावर उतरवणे म्हणजे कविता

प्रेयसीला प्रेम  करायला लावणे म्हणजे कविता

गायीनी वासराला चाटणे म्हणजे कविता

निवडुंगाला पालवी फुटणे म्हणजे कविता .....


आज हि कविता उद्या म्हणजे हि कविता

मनातले भाव म्हणजेच तुझी एक कविता .....


                                                       .....मंदार बापट 

मिलिंद कुंभारे

कविता म्हणजे काय असते........

कविता म्हणजे.........
कविता म्हणजे ..........
काय असते........
शब्दांत गुंफलेलं
त्याचं गुलाबी स्वप्न असते,
कधी मेघांतून बरसणारा पाऊस असते,
तर कधी डोळ्यांतून बरसणार,
तिचं अंतरंग असते,
कधी तिच्या आठवणीत,
जागलेली रात्र असते,
तर कधी त्याच्या मिठीत,
स्थिरावलेला दिवस असते,
कविता म्हणजे
काहीच नसते,
तिच्या माझ्या  मनाचा,
एक ध्यास असते,
तिच्या माझ्या मनाशी साधलेला,
एक संवाद असते!

मिलिंद कुंभारे  :) :) :)

Çhèx Thakare

मी लिहत असतो माझे दू:ख  माझे अनूभव माझे सूख
ऊतरवत असतो शब्दात जूऴवतो मी अक्षरे

अन् अशी बनते माझी कविता

sweetsunita66

मेरी कविता
कविता कल -कल करती दिल से निकली ,
कलम से उतरी धरती पर ,
मेरी सच्ची कविता है ये ,,
सागर और सरिता है ये ।
जितना सोचो बहती जाती ,
स्वच्छंद विहार करती जाती ,
सुगम -दुर्गम मन के पहाडो से झर-झर बहती धारा है ये ,
मेरी सच्ची कविता है ये .............
जितना दबावो उफ़नकर आये ,
बिना उतारे चैन ना पाये ,
नही तो दिल का सुख-चैन भी खोये ,
हर एक मन का आईना है ये ,
मेरी अच्छी कविता है ये ...............
अलग-अलग विषय है इसके ,
अनगिनत है भाषा इसकी ,
मेरे मन के थाह से निकाली ,
मन-दर्पण का भेद बताता ,
एक सच्चा आईना है ये .
मेरी सच्ची कविता है ये ...............
प्रेम,द्वेष ,जीवन-दर्शन ,
हास्य,राजनीती और बंधन ,
बीज है इसके जिसमे स्फुरण ,
प्यार मे अनुराग से मान-मनुहार करती ,
द्वेष मे अंतर्मन का द्वंद निकालती ,
जीवन पथ की महिमा महिमा बताती ,
राजनीती की खाल उतारती ,
निडर होकार बहने वाली मन- संवेदना की धारा है ये ,
मेरी सच्ची कविता है ये ,सागर और सरिता है ये ............... सुनिता नाड्गे [शेरकर ] :)

कवि - विजय सुर्यवंशी.

माझ्यासाठी कविता म्हणजे
.
.
माझ्यासाठी...
भावनांचं व्यंजन म्हणजे कविता...
अनं उरी दाटलेल्या...
आसवांचं अंजन म्हणजे कविता...
.
.
व्याकुळ धरेवर पडणारी...
आशेची सर म्हणचे कविता...
अनं सईच्या सोबती व्यतित केलेल्या...
आठवणींची भर म्हणजे कविता...
.
.
प्रितीच्या गंधात न्हाऊनीया...
घातलेली साद म्हणजे कविता...
अनं प्रेमळ त्या हाकेला...
मिळालेली दाद म्हणजे कविता...
.
.
ममतेने भरलेल्या  आईचा...
पदर म्हणजे कविता...
अनं कष्टाने भरलेल्या...
बाबांचा आधार म्हणजे कविता...
.
.
मैत्रिमध्ये असलेला...
त्राण म्हणजे कविता...
अनं मैत्रीखातर त्यागलेला...
प्राण म्हणजे कविता...
.
.
आर्त त्या भावनेला...
मिळालेला शब्द म्हणजे कविता...
अनं अबोल शब्दांत व्यक्त होणारी...
ती आर्त भावना म्हणजे कविता...
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
         (यांत्रिकी अभियंता)

Maroti shahaji guvhade

कोणती देऊ उपमा तिला
काय गाऊ तिचे गुण
जिन माझ्यासाठी सोशल
कष्टाच पाझर
काय म्हणु आई तिला ति जगाची माऊली
मि तिचा मारोती