कविता सुचतात तरी कश्या

Started by हर्षद कुंभार, January 21, 2012, 07:28:05 PM

Previous topic - Next topic

MAROTI SHAHAJI GUVHADE

तिच्या नजरेतील भावना जनू माझ्या कवीतेच्या औळीच
न लिहिता न वाचता प्रिति
फुलाचा सुंगध माझ्या कवितेचा आत्मा आज उदास का राणी

Sachin01More

Kavita astat fakt hrudayacha Bhavana.       jya shabdachya rupane kavitemadhe akarala yetat.

MAROTI


तिच्या नजरेतील भावना जनू माझ्या कवीतेच्या औळीच
न लिहिता न वाचता प्रिति
फुलाचा सुंगध माझ्या कवितेचा, आत्मा आज उदास का राणी
गुलाबाचा गंध औठावर येऊ दे,

MAROTI


माझ्यासाठी कविता म्हणजे
.
.
माझ्यासाठी...
भावनांचं व्यंजन म्हणजे कविता...
अनं उरी दाटलेल्या...
आसवांचं अंजन म्हणजे कविता...
.
.
व्याकुळ धरेवर पडणारी...
आशेची सर म्हणचे कविता...
अनं सईच्या सोबती व्यतित केलेल्या...
आठवणींची भर म्हणजे कविता...
.
.
प्रितीच्या गंधात न्हाऊनीया...
घातलेली साद म्हणजे कविता...
अनं प्रेमळ त्या हाकेला...
मिळालेली दाद म्हणजे कविता...
.
.
ममतेने भरलेल्या  आईचा...
पदर म्हणजे कविता...
अनं कष्टाने भरलेल्या...
बाबांचा आधार म्हणजे कविता...
.
.
मैत्रिमध्ये असलेला...
त्राण म्हणजे कविता...
अनं मैत्रीखातर त्यागलेला...
प्राण म्हणजे कविता...
.
.
आर्त त्या भावनेला...
मिळालेला शब्द म्हणजे कविता...
अनं अबोल शब्दांत व्यक्त होणारी...
ती आर्त भावना म्हणजे कविता...
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
         (यांत्रिकी अभियंता)

Shri_Mech

पावसाच्या चिंबपणातून
उन्हाच्या काहीलीतुन
कुडकुडणाऱ्या थंडीतून
बहरत असते कविता


आठवणींच्या गाठोड्यातून
जगण्याच्या रखरखीतून
अनुभवाच्या संचितातून
जन्म घेते कविता


निसर्गाच्या चैतन्यातून
स्मशानातल्या राखेतून
तलावातल्या गाळातून
रुप घेते कविता


अश्रूंच्या वहनातून
प्रेमाच्या वर्षावातून
नात्यांच्या बंधनातून
वाढत असते कविता


गरीबाच्या झोपडीतून
रस्त्यालगतच्या दारिद्र्यातून
आदिवासी पाड्यांमधून
उमलत असते कविता


खवळलेल्या समुद्रातून
शांत वाहणाऱ्या नदीतून
कोसळणाऱ्या धबधब्यातून
न्हाऊन निघते कविता


शुभ्र हिमपर्वतांमधून
वाळवंटाच्या रुक्षतेमधून
फुललेल्या माळांवरुन
निपजत असते कविता


अध्यात्माच्या पोथीतून
इतिहासाच्या वर्णनातून
वृत्तपत्रांच्या रकान्यातून
बाळसे धरते कविता


घुसमटलेल्या भावनांना
सलणाऱ्या वेदनेला
सैरभैर अस्वस्थतेला
वाट करून देते कविता
Shri_Mech