आत्महत्या

Started by Nitesh Joshi, May 28, 2012, 10:18:25 AM

Previous topic - Next topic

Nitesh Joshi

थंडीचे दिवस होते. हवेत गारवा चांगलाच जाणवायला लागला होता. रविवारचा दिवस, सकाळी-सकाळी वाफाळलेल्या कॉफीचा कप हातात घेऊन जरा निवांतच पपेर वाचायला घेतला आणि पहिल्या पानावरच बातमी - - - - - कारणास्तव दाम्पत्याची आत्महत्या. मन सुन्न झाल. मनात विचार आला, खरच इतकं मातीमोल झालय जीवन? काहीच किंमत नाहीये का आपल्या जगण्याला? की मारण्याच्या शर्यतीत सर्वांना पाहिलं येण्याची ओढ लागलेली आहे? काहीही क्षुल्लक कारण, आणि केली आत्महत्या. पण खरच का प्रत्येक गोष्टीला आत्महत्या हा एकमेव उपाय आहे?
आता तर कारणहि लागत नाही आत्महत्या करायला. काही दिवसांपूर्वी जवळच राहणाऱ्या एका मुलाने आत्महत्या केली आणि कारण काय तर आई वडिलांनी परीक्षा चालू असल्या कारणाने TV पाहण्यास मनी केली. १२-१३ वर्षांचा मुलगा, आत्महत्या करणं म्हणजे काय हे तरी त्या कोवळ्या जीवाला काळात असेल का? रोज रोज सकाळी पपेरमध्ये त्याच त्या बातम्या वाचून मनावर परिणाम झाला आणि याचा शेवट काय होतो हे माहित नसणाऱ्या जीवाने जीवाचाच अंत करून घेतला.
परीक्षांच्या काळात तर याला अंतच नसतो. पपेर नापास होण्याच्या भीतीने आत्महत्या, कॉपी पकडली गेली कि आत्महत्या, मार्क्स कमी पडले कि आत्महत्या . . . . खरच का आजच्या या INSTANT च्या जमान्यात कोणाकडेच थांबीला वेळ नाहीये? नाही झालो पास, पडले कमी मार्क्स तर याचा अर्थ असा तर नाहीये ना कि सगळाच संपल आता आपण काहीच नाही करू शकत? सर्व दरवाजे कायमचे बंद? जर का असाच प्रयत्न न करता एकाच अपयशानंतर सर्व शास्त्रज्ञांनी आत्महत्या केली असती किवा प्रयोग करण्याचे थांबवले असते तर आज आपण हे दिवस पाहूच शकलो नसतो. थॉमास एडिसन यांनी वीजेचा शोध लावला हे सर्वांना माहीतच आहे पण त्यासाठी त्यांनी २००० अयशस्वी प्रयोग केले हे विसरून चालणार नाही.
अपयश म्हणजे काय ह्याचा मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अब्राहम लिंकन. सर्वांना माहित आहे तो एक यशस्वी माणूस म्हणून पण त्याच्या जीवनात जी काही अपयश आलेली आहेत ती किती जणांना माहित आहेत? अवघी छपन्न वर्षे दोन महिने आणि तीन दिवसांचे आयुष्य जगलेला अमेरिकेचा सर्वाशेष्ठ राष्ट्राध्यक्ष, एकाही वर्ष शाळेत गेलेला नव्हता. आता त्याचे अपयश बघा वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी त्याची आई मरण पावली. वयाच्या एकविसाव्या वर्षी ऐन तारुण्यात त्याला व्यवसायात मोठा आर्थिक नुकसानीचा फटका बसला त्यानंतर त्याने पोस्टमास्तर म्हणून काम सुरु केले. वयाच्या तेविसाव्या वर्षी लिंकन यांनी पहिली सार्वत्रिक निवडणूक लढवली आणि त्यात ते सपशेल पराभूत झाले. त्याच काळात त्याचा अवघ्या चार वर्षांचा मुलगा अचानक मरण पावला. त्यानंतर अवघ्या २४ दिवसांनी त्याच्या वडिलांचे दु:खद निधन झाले. सारे आघात धैर्याने सहन करत तो वेगवेगळ्या निवडणुकींना उभा राहिला आणि निग्रो गुलामीच्या विरोधात झुंज देत होता. त्याच काळात त्याची प्रिय पत्नी मरण पावली. त्यानंतर त्याच्या वयाच्या ३४ व्या वर्षी त्याने संसदीय विधीमंडळाची निवडणूक लढवली आणि या वेळेसहि तो (नेहेमीप्रमाणे) हरला. नंतर वयाच्या ४५व्या वर्षी त्याने सिनेटची आणि ४७ व्या वर्षी अमेरिकेच्या उप्रष्ट्राध्याक्षापदाची निवडणूक मोठ्या जिद्दीने लढवली पण याही निवडणुकांत तो सपशेल पराभूत झाला. आता मला सांगा यात कुठे तरी यशाची चव त्याने चाखली होती का पण इतकं सगळ होऊनही त्याने हार मानली नाही आणि ४ मार्च १८६१ रोजी वयाच्या ५२ व्या वर्षी त्याने अमेरिकेचा १६ वा राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यभाग सांभाळला. शेवटी यावरून असं  लक्षात येत की " A winner is not one who never fails but one who NEVER QUITS. . . ! "

अपयशात कुठलेही वाईट, नकारार्थी विचार आपल्याला संपवायला बघतील, त्यापूर्वीच चेहऱ्यावर हास्य आणा आणि स्वतःलाच सांगा की मी या जगात असून अजून जिवंत आहे याचाच अर्थ मला अजूनही जिंकण्याची संधी आहे...!!!

आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,
फुकट मिळालेला वेळ नव्हे,
आयुष्य 1 कोडं आहे,
सोडवाल तितक थोडं आहे.

mahesh4812


swati121

mAST KARAV TEVAD KAUTUK KAMICH AHE TUMCH.


Nitesh Joshi


Khup chaan lekh ahe..

very nice

mAST KARAV TEVAD KAUTUK KAMICH AHE TUMCH.


Dhanyawad mandali

ha maza pahilach chotasa prayatna ahe
manapasun dhanyawad

jyoti salunkhe


Nitesh Joshi




अशोक भांगे (सापनाई कर )

हे वाचून मला एक Quate आठवला ,
  " जो पर्यंत मी लढाई जिंकत नाही ,
तोपर्यंत लढाईचा शेवट होणे शक्य नाही .
आयुष्यातील प्रत्येक लढाई जिंकली नसेल कदाचित ,
पण लढली जरूर आहे ...। "

मित्रा खूप छान विषय हाताळलास ......