ती... एक प्रश्न कविता...

Started by Ankush S. Navghare, Palghar, December 23, 2012, 01:54:39 AM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

एकाकी आयुष्य जगत असताना
अचानक कुणाची तरी चाहूल लागली...
खुप काळ वाट पहिली जिची
कदाचित तीच जीवनात आली...???

आधी Hello मग Hi करता करता
थोडीफार तोंडओळख झाली
आणि मग हळू हळू का होईना
जवळीक वाढत गेली...???

एकदा धीर करून विचारले
जरा No. देता का तुमचा
त्यावर ती जरा चिडूनच म्हणाली
असे काय Urgent काम काढले???
मी रोज इकडे येतेच इथेच भेटू
जर तुमचे काही अडले...

मी म्हणालो तसे काही नाही
No. ची काही घाई नाही
तरीही असेच विचारले...
तिने वैतागून No. दिला
आणि मला वाटेला लावले...

मग ती रोज यायची
मी चोरून तिला पाहायचो
पाहता पाहता लग्नाची
स्वप्ने रंगवायचो...

रोज मनात यायचे
हिला आता विचारावे
उद्या विचारू उद्या विचारू करता करता
विचारायचेच राहायचे...

एक दिवस अचानक ती येताना दिसली
आजूबाजूला कुणी नव्हते
तर वाटले बरी संधी हाती आली
मी विचारणार इतक्यात
तीच काहीतरी म्हणाली....

ते ऐकून माझ्या पायाखालची
जमीनच सरकली
विचारायचे राहीले दूर
आता झाला होता सर्वच घोळ...

आता मी तुम्हाला विचारतोय
तुम्हीच सुचवा पुढच्या ओळी
असे काय तिने म्हटले असेल???
आणि मला पाठवले असेल पाताळी... :'( :'(

.... प्राजुन्कुश
.... Prajunkush


Jayesh Patil

Tine mhatale asel ki tiche lagna jamaley...???
Chhan kavita ahe...

PINKEY

 :-\ ti boblali asel aj raksha bandhan ahe hat pudhe kar rakhi bandhate  ;D ;D ;D ;D ;D ;D ;D ;D ;D

केदार मेहेंदळे

#3
Mitra.....tujhyaa prashnaach uttar mhanun majhyaa love story hyaa kavitetali kaahi kadavi ithe post karatoy. hi kavita mi 3 bhagant post keli hoti. tyaa link sudhdha detoy.

तिच्या धुंद श्वासांनी मी असा romantic झालो.
घेऊन हातात हात, तिच्या डोळ्यात पहात मी म्हणालो.
"तुझ्या सौंदर्याचा मी खरा भक्त आहे, तुझ्या 
क्षणाच्या सहवासा साठी माझ life कुर्बानआहे."

ऐकल हे अन ती गोड गोड हसली.
घेऊन माझा हात हतात ती म्हणाली.
thank  you  dear  for  offiring  your  life .
but ..... my  rate  is  only  10 ,000 full  night .

फिरायला A /c car , अन रहायला hotel  five  star .
dinner intercontinental  अन वर स्कॉच ची धार.
मैत्री खातर 40% friendship  discount  देतेय.
तरी सुद्धा 100% satisfaction ची garentee घेतेय.

असेल वेळ तुला तर सांग, मी आज फ्री आहे.
नसेल तरी हरकत नाही, एक appointment waiting आहे.
बघून माझा चेहरा गोरामोरा, ती काय ते समजली.
घेतला गालगुच्चा माझा अन टाटा करून निघून गेली.

जिच्या साठी झुरत होतो ती कधीही available होती.
तरी सुद्धा माझ्या मनाला ती ख़ुशी खुलवत नव्हती.
नियतीचा हा खेळ बघून माझ डोकच चालत नव्हत.
ह्या प्रकारात माझ नक्की काय हरवल, समजत नव्हत.



http://marathikavita.co.in/index.php/topic,5716.0.html   लव्ह स्टोरी - भाग 1
http://marathikavita.co.in/index.php/topic,5732.0.html लव्ह स्टोरी - भाग 2
http://marathikavita.co.in/index.php/topic,5754.0.html लव्ह स्टोरी - भाग 3

Ankush S. Navghare, Palghar


Sonal Hatkar

Tine may be lagnala invite kele asel.. chan kavita ahe.

Ankush S. Navghare, Palghar

Sonal ji...
... Khup abhar agadi manapasun. Pan ti asale kahi mhanali nahi.