चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

मधुराच्या चारोळीवर आल्या 
नव्याण्णव प्रतिक्रिया
सगळ्यांवर कडी माझी
शंभरावी प्रतिक्रिया


केदार ....

मिलिंद कुंभारे

#101
मधुराच्या चारोळीवर आल्या
शंभर प्रतिक्रिया
माझ्याकडून तीला
१०१ शुभेस्यांचा
मनापासून नजराना!

मिलिंद कुंभारे  :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)

Madhura Kulkarni

धन्यवाद! धन्यवाद!!
पण मला वाटत कि आपण सगळेच इतक्या छान चारोळ्या करत आहोत, कि मलाही तुम्हा सर्वांना अभिनंदन करावस वाटतंय.....
म्हणूनच, मनापासून अभिनंदन !
आणि या 'चारोळी' उपक्रमातून आपला एक 'छान कवींचा' असा जो ग्रुप तयार झालाय, तेच मला खूप महत्वाच वाटत.

Madhura Kulkarni

चांदण्यांचा नेसून शालू,
धावत धावत आली,
सागरात मिसळूनी
तयाशी एकरूप झाली....

भुलली विशाल कायेला,
पण माहित तिजला नव्हते,
काया विशाल तरीही
त्याचे पाणी खारट होते.....

Yogesh9889

Ti ayushatun jatana,
Athvani aandan mhanun deun geli,
Aani tichya naynatil swapne olich theun,
Mala korda nirop deun geli...

मिलिंद कुंभारे

#105
yogesh छान प्रयत्न आहे!
असाच प्रयत्न करीत रहा!
चारोळी जमेल तुला! :) :) :)

आयुष्यातून माझ्या जाता-जाता  :'( :'( :'(
आठवणी तुझ्या,
मनात माझ्या कोरून गेली,
स्वप्ने तुझी अधुरीच राहिली,
अन कोरडाच निरोप,
मजला देऊन गेली! :( :( :(

मिलिंद कुंभारे

मिलिंद कुंभारे

योगेश कविता मराठीत लिहित जा! इंग्लिश मध्ये वाचायला ताण पडतो!
मराठी typing साठी खालील लिंक follow कर!
http://www.google.com/intl/mr/inputtools/cloud/try/

केदार मेहेंदळे

कळता सागराचे वास्तव
अश्रू नयनातून ओघळला
नवल वाटले तिजला
तो हि खारट होता

केदार....

Madhura Kulkarni

निर्मळ पाणी तिचे
गोड होते कधीकाळी...
खारटपणा सागराचा
तिचं अंग अंग जाळी...

Yogesh9889

सरून गेली रात्र
आणि टळून गेली वेळ...
पण थांबता थांबेना
तुझ्या आठवणींचा खेळ...