चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

rudra


Madhura Kulkarni


कवि - विजय सुर्यवंशी.


रातराणीचा तो खेळ....
अन नाजुक होती ती वेळ....
बंध तुझिया प्रेमाचे सखे...
जणु उन सावलीचा मेळ.....

Madhura Kulkarni

वाह! वाह!

कविता लिहितेस तू....
मज शब्द हि अनोळखी...
जगाहून हि वेगळी
लाभली मला सखी!

मिलिंद कुंभारे

रातराणीच्या फुलांनी,
बहरली होती रात!
फुलांच्या दुनियेत,
लाभली तुझी साथ!
मृदू स्पर्श तुझा,
अन सजली होती रात!
ओठांना ओठ टेकलेली,
अन थांबली होती पहाट!

मिलिंद कुंभारे

kuldeep p

ना कळे मला

हा खेळ भावनांचा

कसे सांगू तुला

मनी कल्लोळ अव्यक्त भावनांचा
 

rudra

u both r brilliant.........

Madhura Kulkarni

#117
फिरु कशी मी परत आता?
अंधारल्या दाही दिशा....
जीवनात बघ रात जाहली...
होईल का रे सांग उषा???

kuldeep p

निसर्गाचा क्रमच असतो

रात्री नंतर दिवस उजाडतो

जीवनाचेही असेच असायचे

दुखः नंतर दिवस सुखाचे

दुखः मुळे सुख मिळते

सुखामुळे दुखः विसरते

माणसाचे तर  असेच असते

दुखः ला तर किंमतच नसते
 

Madhura Kulkarni

वाटेत चालताना
काट्यांना मी
तुडवीत गेले.....
आता फुलांचीही
मनामध्ये या बसली धास्ती...

वनामध्ये या माणसांच्या,
वारा बनुनी, फिरुनी आले,
आणि नंतर कळले मजला;
लांडग्यांची ती होती वस्ती.......