चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

Madhura Kulkarni

पाहुनी त्या फुलाकडे
गाली तुझ्या खुलली कळी...
डोळ्यांत वसले स्वप्न नवे
अन हंस विहरति जळी...

kuldeep p

काय झाले असे  की
थांबल्या आपल्या चारोळ्या
सुरुवात करतो नव्याने
होऊन जाऊद्या चारोळ्या

Madhura Kulkarni

शब्द सारे गोठले अन भावनाहि गोठल्या...
हरवलेल्या वाटा माझ्या, शोधताना संपल्या....

मिलिंद कुंभारे

#133
मधुरा ताई  :)

ओसंडून जावू दे, नयनी गोठलेल्या भावनांना,
कदाचित तो प्रवाह, शोधील एक चोरवाट,
घेईल ध्यास अंतरीचा अन गवसेल त्याला,
एक नवी वाट,एक नवी पहाट!

मिलिंद कुंभारे

Madhura Kulkarni

जुने सोडुनिया, आले नवतीचे वारे....
मनावरी अजूनही जुन्याचे पसारे....

बंद केली समाजाने सारी सारी दारे...
बसवले कळ्यांवरी कठोर पहारे.....

मिलिंद कुंभारे


नको करूस भावनांना कैद असे,
उघड तू बंद दारे,
झुगारून सारे पहारे,
कळी न कळी उमलू दे,
गंध आसमंती दरवळू दे,
फुलपाखरांशी अवती भवति भ्रमरू दे! :) :) :)

मिलिंद कुंभारे

Madhura Kulkarni

सनातनी समाजाची खोड कधी मोडणार नाही....
स्वतःच्याच पाकळ्यांत बंद कळी कधी उमलणार नाही...

मिलिंद कुंभारे

#137
आज आहे ती स्तब्ध,
मीही झालोय स्तब्ध,
कळेना मज,
मोडणार कोण सामाजाची रे बंधनं,
उमलणार कधी रे कळी ती पाकळ्यांत बंद! :( :( :(

Madhura Kulkarni

बांधले होते आम्हाला जोखडांनी कुणी...
तोडण्या सुसज्ज झालो मिळूनी साऱ्याजणी....

मिलिंद कुंभारे


गेलेत ते दिवस, अन बदललेत युगं,
बघ आज सारे मोकळे आभाळ,
बळ पराकोटीचे तुझ्या  पंखात,
घे भरारी अन कर सार्थक स्त्रीजन्माचं! :) :) :)

मिलिंद कुंभारे