चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

Madhura Kulkarni

दोन डोळे,
फार भोळे...
सांग का बनले
अश्रुंचे तळे?

Madhura Kulkarni

पावसातले ओले ओले,
क्षण ते सारे, जपले रे....
डोळ्यांतून तो पुन्हा बरसला,
पुन्हा पुन्हा मी भिजले रे....

मिलिंद कुंभारे

आज वाटते नव्याने पुन्हा उमलून यावे...
थेंब प्रत्येक पावसाचे तुझ्यासाठीच जपावे...   

कळी उमलली वाटतं ......

Madhura Kulkarni

:)

पुन्हा नव्याने खुलून यावे,
नवजीवनाचे सुगंध माझे
वेलीवरी उमलले जरी मी,
आकाशीचे छंद माझे.....

sweetsunita66

पृथ्वी म्हणे चंद्राला माझे प्रेम तुझ्या वरती
चंद्र म्हणे पृथ्वीला मग कशाला घिरट्या मारते सुर्या भोवती  :D :D :D

sweetsunita66

पृथ्वी म्हणे चंद्राला माझे प्रेम तुझ्या वरती
चंद्र म्हणे पृथ्वीला मग कशाला घिरट्या मारते सुर्या भोवती

कवि - विजय सुर्यवंशी.

छान सुनिता..... :)

वेडात अशी वेडावले....
कि वेडात तुला पाहिलेले...

वेडात तुझ्या गुरफटुन...
वेड्या चंद्रा मन तुला वाहिलेले..... :)

कळलं नाही तेजाळणारा  तो प्रभाकर कधी मनास भावला.... :|
अनं सर्वस्व त्याच्या तेजाला वाहिलेले.... :p:)

Madhura Kulkarni

Sunita,

तुझे कवितांच्या भेंड्यांमध्ये मनापासून स्वागत!!!

आता मी....

काही बोलायचं...
काही सांगायचं....
बरसणाऱ्या पावसात
बेधुंद नाचायचंय....

कवि - विजय सुर्यवंशी.

छान मधुराजी.

प्रिय सई....

मनातल्या आभाळात
मेघ येतात भरुन....
रुतु होतात हिरवे
आठवणीँना पांघरुण....
शिशिरातला प्रवास
उमेद हरवलेला....
आयुष्याच्या पानगळीत
अस्तित्व जाईल विरुन....

Madhura Kulkarni

विजय दादा,

खूप छान! मस्त! काळजाला भिडणारे लिखाण.....खूप छान!

पण हि सई कोण? म्हणजे उत्तर देण बंधनकारक नाही....तुला वाटलं तरच उत्तर दे.