चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

सई माझी जिवाभावाची....
मैत्रिण कि प्रेयसी अजुन कळलंच नाही....
आहे अशी वेडी माझ्यावर हक्क गाजवणारी जीला माझी कविता कधी कळलीच नाही....
सोबत असुनही मी जवळ नसायचो....
दुराव्यात जिच्या मी विरहगीत गायचो....

AND madhuraji thanks for reply.....

Madhura Kulkarni

:)

निसर्ग सारा बहरून गेला फक्त तिच्या येण्याने....
सूर्य हि पावसात भिजला फक्त तिच्या येण्याने...


मिलिंद कुंभारे

इंद्रधनू रंग सारे उधळून गेला
फक्त तिच्या येण्याने....
सूर्यही चंद्रासम शीतल झाला
फक्त तिच्या येण्याने....
:) :) :)

Madhura Kulkarni

तिच्या येण्याने मनी
बहरले वृंदावन...
गेले भान हरपून,
नाचलो होऊन बेभान...

मिलिंद कुंभारे

#164
तिच्या येण्याने
प्रेमांकुर एक मनी अंकुरले
जीवन सार्थकी लागले अन
अंगणी माझ्या नंदनवन फुलले ......

Madhura Kulkarni

तिचे हसणे नाजूक
अन मोहक लाजणे,
ती बघते वळून
येते आकाशी चांदणे...

sweetsunita66

पावसाचा प्रत्येक थेंब पिऊ पाहतोय  चकोर
पावस सरींनी वसुंधरा नेसली हिरवा शालू नवा नकोर

sweetsunita66

तिचे येणे तिचे जाणे  जीवास वेड लावी
जातांनाच परत येण्याचा ध्यास मनी लावी

Madhura Kulkarni

सांजवेळी अंगणात
माझ्या चंद्र उतरतो,
'गेली कुठे रे चांदणी?'
मला विचारतो.

sweetsunita66

सांजवेळी अंगणात
माझ्या चंद्र उतरतो,
'गेली कुठे रे चांदणी?'
मला विचारतो.         
                    त्या दिवशी आकाशात अवस असावी जरूर ,
चंद्र तुमच्या अंगणात चांदणीला शोधे भिरभिर ,
सापडली त्याला चांदणी तुमच्या चेहऱ्या मधे ,
म्हणून त्याच्या जीवाला "सुकून" वाटतोय की "सुरूर "