चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे


बघून हि स्माईली,
प्रसन्नता मनी दाटली,
कळी उमलली अन,
रानेवने सारी हिरवीगार झाली!
:) :) :) :) :) :) :) :) :) :)

मिलिंद कुंभारे

Madhura Kulkarni

गार गार वारा, हिरव्या हिरव्या वनातला....
गंध ओल्या या मातीचा ओढ लावतो मनाला....

मिलिंद कुंभारे

वाऱ्याने ढगांशी गुज सांगू दे,
पावसाने सरी सरींमध्ये बरसू दे,
पानाफुलांमध्ये थेंब थेंब बिखरू दे,
तहानलेल्या मनाला  चिंब चिंब भिजू दे!!!

मिलिंद कुंभारे

Madhura Kulkarni


वेल उभी भुईवर,
तिला फुटता अंकुर,
दाटून आला ऊर,
बघ आभाळाचा..

ढग पाणावला,
मोर बनात नाचला,
भूमीवरी पसरला,
रंग पावसाचा.....



कवि - विजय सुर्यवंशी.

प्रेमाच्या या पावसात सखे.....
आज मला न्हावुन जाऊ दे.....
केसात माळलेल्या या तुझ्या गजय्रात.....
निष्प्राण श्वास हा माझा
आता फुले दे.....
प्रेमाची स्पंदनं अन प्रेमाची ही भाषा.....
आता नजरेला कळु दे.....
घायाळ त्या प्रेमळ मनाला साथ आता तुझी मिळु दे....
थरथरत्या ओठांची चाहुल
आरक्त स्पर्शाने थांबु दे.....

प्रेमाच्या या पावसात सखे मला आता चिँब भिजु दे.....

मिलिंद कुंभारे

ढग पाणावला,
मोर बनात नाचला,
भूमीवरी पसरला,
रंग पावसाचा.....

sundar..........

कवि - विजय सुर्यवंशी.

प्रेमाच्या या पावसात....
सखे मी तुझ्यासोबत भिजेन....
गंधित या आपुल्या नात्याचे....
रंग भुमीवरी उधळेन....
कोसळणाय्रा पावसातही तुझ्या आसवांना....
मनाच्या कोपय्रात जपेन....

कवि-विजय सुर्यवंशी.
      (यांत्रिकी अभियंता)

Madhura Kulkarni


ढग पाणावला,
मोर बनात नाचला,
भूमीवरी पसरला,
रंग पावसाचा.....

sundar..........

Thanks Milind dada.... :)

Madhura Kulkarni

पावसात भिजलेली हिरवीशी  पाने...
मातीस गंध नवा दरवळे आनंदाने....

आज वाटते नव्याने पुन्हा उमलून यावे...
थेंब प्रत्येक पावसाचे तुझ्यासाठीच जपावे...