चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

"जास्त तुम्ही हसु नका....
हसलात तर दात दिसतील....
हसताना चमकणारे दात....
नक्कीच 'COLGATE' चे असतील....
अन अति चमकले जर दात आपले....
तर COLGATE वाले आपल्याला ब्रँड अंबॅसिडर करतील....
असंच हसु चालु राहीलं आपलं....
तर काजल अग्रवालला सगळ सोडावं लागेल....
घरदार चालवण्यासाठी पुन्हा मिठाच्या शोधात फिरावं लागेल....
.
.
. :D:D माफी असावी सुनिता सहज थट्टा केली:D

sweetsunita66


कवि - विजय सुर्यवंशी.

स्माईल नको तुम्हीपण खेळा....

sweetsunita66

कधी कधी स्तब्ध राहून,
बरंच काही सांगता येतं ,
पकडता न येणाऱ्या धाग्यांना,
मनातच गुंफता येतं  :)

कवि - विजय सुर्यवंशी.

" रेशमाच्या धाग्यांनी आपण.....
कधी कधी नाती विणतो......
भावनांच्या गर्तेखाली.....
कुणासाठी तरी हरवतो....
स्तब्ध राहुनही.....
ठाव मनाचा घेतो....
एकांताच्या समयी सुध्दा.....
इमले स्वप्नांचे रचतो....."
.
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
         (यांत्रिकी अभियंता)

sweetsunita66


रेशमी धाग्यां सारख्या कोमल - मृदू या भावना
उमजेल का कधी कुणा, सखे मज सांग ना ,
सुटेल का ग  बंध सारे दडपनाऱ्या प्रीतीचे ,
उल्ल्हासुनी गाईल का  नव-राग कोकीळ सांग ना  :)............। सुनिता

कवि - विजय सुर्यवंशी.

#276
"तुझिया मनाच्या भावना सखे....
एकदिवस त्याला उमजतील....
कोकिळा ही मग गाईल मंजुळ गाणी....
अनं बंध प्रितीचे मोकळे होतील....
गंधित होतील स्पंदनं श्वासांची....
अन ठाव मनाचे नजरेत भरतील....
तुझ्या प्रितीस साजण्या....
उन्हात मेघ बरसतील....
आरक्त अन कंठित भावनांची....
हृदयी तुझिया शिल्पं होतील...."
.
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
        (यांत्रिकी अभियंता)

Madhura Kulkarni

#277
तुम्हां दोघांच्या आग्रहास्तव...माझ्या चार ओळी..... :)


सरली किती युगे,
त्या पल्याड पोचताना,
किती जोरात धावले,
पण वाटच संपेना....


तुझ्याकडे येण्यासाठी
जीव किती हा झूरतो,
तुझ्या विरहात डोळा,
ढग पाण्याचा भरतो...

जिथे तिथे तुझी
प्रतिमा दिसते,
पाहून माझ्याकडे,
किती मोहक हासते.....

जरी इतकी जवळ,
तरी का दुरावा?
प्रेमाचा तो क्षण
वाटे हवा हवा....


मधुरा कुलकर्णी.

कवि - विजय सुर्यवंशी.


sweetsunita66

बऱ्याच ओळींचा प्रसाद दिलाय ,अतिशय आवडला ...  :) :)