चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

 vijay :)अतिशय आवडली कविता ...  :) :)

कवि - विजय सुर्यवंशी.

सुनिता आपल्याला कविता आवडली... पैसे वसुल झाले मग... :D

कवि - विजय सुर्यवंशी.

"प्रतिसादाने तुमच्या हर्ष मजला झाला....
चार ओळींच्या चारोळीला आज पुन्हा भाव आला....
पुन्हा सुचले यमकछंदांचे तेच बहाणे तराणे....
अन काव्यफुलांना आज बहार आला....
तुमच्या शब्दांच्या सानिध्यात....
रुतु सारे बहरुन येतील....
मनातील भावनांना शब्दांची परिभाषा मिळेल....
अन या मनभावनांची काव्यफुले होतील...."
.
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
       (यांत्रिकी अभियंता)

sweetsunita66

"प्रतिसादाने तुमच्या हर्ष मजला झाला....
चार ओळींच्या चारोळीला आज पुन्हा भाव आला....
पुन्हा सुचले यमकछंदांचे तेच बहाणे तराणे....
अन काव्यफुलांना आज बहार आला....
तुमच्या शब्दांच्या सानिध्यात....
रुतु सारे बहरुन येतील....
मनातील भावनांना शब्दांची परिभाषा मिळेल....
अन या मनभावनांची काव्यफुले होतील...." :) :)
                                                     संगतीने एकमेका,
                                                      काव्य सुगंध दरवळणार
                                                      ही काव्य सुमनेच,
                                                      आपल्या नात्याची गोष्ट सांगणार.......  सुनिता :)     

कवि - विजय सुर्यवंशी.

"नात्याला आपुल्या आज अर्थ आला....
अन मन भावनांना कवितेची बाग मिळाली....
आनंदाच्या  आसवांनी झाले ओले सारे मन....
अनं आसवांचीही कवने झाली...."
.
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
         (यांत्रिकी अभियंता)

Madhura Kulkarni

#285
तुम्हा दोघांमुळे कविता करायला मजा येते आणि उत्साह मिळतो....

माझ्या काही ओळी...


कधी कधी वाटत,
मनोसोक्त जगावं....
कधी तरी पक्ष्यापरी
मुक्तपणे उडावं.....

नियम द्यावे तोडून,
दूर दूर जावं....
कुठल्यातरी वेलीवर
फुल बनून फुलावं....

तेव्हातरी निदान कोणी
फुलासारखं जपावं,
रुतण सोडून काट्यांनीहि
वाऱ्यावरती डुलावं.....


मधुरा कुलकर्णी.

sweetsunita66

नियम द्यावे तोडून,
दूर दूर जावं....
कुठल्यातरी वेलीवर
फुल बनून फुलावं....
   छान ओळी रचल्यास !मधुरा :) :)

कुणीतरी जपावं मला नाजूक  फुलासारखे
असे प्रत्येकालाच  मनोमनी वाटते न सखे
परी प्रत्येक सुंदर अन अनमोल वस्तूला,
जपण्या साठी जसे  कवच असते काही
तसेच फुलालाही जपण्या साठी काटे असतात नाही ?
पण फुलंच जेव्हा घायाळ होते काट्यांच्या बोचण्याने ,
तेव्हा वाटते हे काट्यांचे कवच नको अन नको ते घायाळणे ,,,,,,,,सुनिता  :)

sweetsunita66

"नात्याला आपुल्या आज अर्थ आला....
अन मन भावनांना कवितेची बाग मिळाली....
आनंदाच्या  आसवांनी झाले ओले सारे मन....
अनं आसवांचीही कवने झाली...."विजय छान लिहिलस  :) :)

आनंदीही अश्रू अन अश्रू दुखातही,
आनंद-घन बरसे असे सुखातही.
पाणावलेल्या नेत्रांना उसंत असावा  जरा, 
काळजाचा  ठाव घेते  भावना रुपी धरा  ,,,,,,सुनिता  :)

कवि - विजय सुर्यवंशी.


कवि - विजय सुर्यवंशी.

भावना रुपी धरेला आता जपायला हवं....
.
.
.
भावना रुपी धरेला आता जपायला हवं....
आयुष्याच्या वेड्या वळणी मनाला सावरायला हवं....
.
.
.
रोजंच माडतो पसारा  मनाच्या घरात....
आठवणींच्या या पसाय्राला आता आवरायला हवं....
.
.
.
बालपणीच्या बागेत बागडलो मनसोक्त....
वास्तवाच्या जगती आता दौडायला हवं....
.
.
.
काळजाला तडे देणारे भेटतात सर्वजण....
कुणा आपल्यासोबत या तड्यांना सांधायला हवं....
.
.
.
प्रवासी तर नेहमी भेटतात चालताना....
कुणा परक्याला प्रेमाने आपलंस करायला हवं....
.
.
.
इमले स्वप्नांचे तर रोजच रचतो मनात....
घर प्रितीचं आता सईसाठी बांधायला हवं....
.
.
.
आयुष्यात हरत तर नेहमीच आलो....
कुणाच्या आशेसाठी आता जिँकायला हवं....
.
.
.
शब्दांच्या दाहकतेने दुर केले नात्यांना....
रेशमाच्या धाग्यांनी या नात्यांना आता विणायला हवं....
.
.
.
भावना रुपी धरेला आता सावरायला हवं....
आयुष्याच्या वेड्या वळणी सावरायला हवं....
.
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
        (यांत्रिकी अभियंता)