कवितांना शुन्य प्रतिसाद!

Started by मिलिंद कुंभारे, March 19, 2013, 02:03:19 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

pan tikde sudhdha kiti lok te click karatat.... aani je karatat tyatlya kiti janani te kharokharach vachalel asat ha ek sanshodhanacha vishay hoil :)

मिलिंद कुंभारे

प्रिय विक्रांत!
मला वाटतं MK वरहि fb like असा reply देता  येतो! तसा option मी MK वर कविता वाचतांना नेहमीच बघतो!
किमान असा reply तरी आपण देऊ शकतो. त्यात काही जास्त वेळ जाईल असे नाही वाटत!
तसेच mk वर पोस्ट केलेल्या कवितांचे कुठेतरी मुल्यांकन हि व्हायला पहिजे असे वाटते! जसे कि शाळेमध्ये ग्रेड (A*, A, B) दिले जातात, त्यावरून त्या कवीला त्याने लिहिलेल्या कवितेचा दर्जा कळेल व तो अधिकाधिक चांगली कविता हिहीण्याचा प्रयत्न करील!
मला वाटत MK Admin असे काही पर्याय website वर उपलब्ध करू शकेल! :-\ :-\ :-\

मिलिंद कुंभारे  :) :) :)

विक्रांत

केदार ,मान्य आहे हा आक्षेप .मुळात कविता वाचणारे कमी,समजणारे कमी ,आवडणारे अजून कमी .कारण कविता गरज नाही.गंमत सांगतो विन्दाचा स्वेदगंगा मी विकत घेतला १५ रु.ला दादर मँजीस्टिक  दिनांक ११-०८-१९९० पुनर्मुद्रण १९६९ म्हणजे २१ वर्ष ते पुस्तक माझी वाट पाहत होते .(तेव्हा त्यांना ज्ञानपीठ मिळाला नव्हता ) त्यामुळे मराठी कविता बद्दल वाचकांची आवड लक्षात येते  .
मला वाटते जरी वाचक मिळाला तरी कवितेचा जन्म धन्य व्हायला हवा .

मिलिंद ,खरतर प्रत्येक कविता सुंदर असते .कुणाला आवडते ,कुणाला नावडते .त्यात grading :-[ मला नाही पटत . तसेच fb like पर्याय नको mk like पर्याय हवा असे मला वाटते .विंदा च्या भाषेत सांगायचे तर वाचणाराच एक दिवस लिहणा-याचे हात घेतो . हेच कवितेचे यश असते, साफल्य असते असे मला वाटते .

विक्रांत

केदार मेहेंदळे

Vikrant,

sundar lihilas. ":वाचणाराच एक दिवस लिहणा-याचे हात घेतो . हेच कवितेचे यश असते, साफल्य असते"  kyaa baat hai.... man gaye.

मिलिंद कुंभारे

प्रिय विक्रांत! :) :) :)

शाळेतल्या सारखं ग्रेडिंग मलाही नाही पटत! पण प्रत्येक चांगल्या कविताला प्रतिसाद हवाच!
तू म्हणतोस तसे MK like असायला हवे! आपण बहुतेक जण प्रतिसादात काय लिहितो .......
अप्रतिम, सुंदर, छान, मस्त, वा वा , क्या बात, प्रयत्न कर , लिहित रहा ........
असे पर्याय जर MK वरच उपलब्ध करून दिलेत तर वाचकांना अभिप्राय द्यायला सोपे होईल असे मला वाटते!

ह्यात वाचकाचा वेळ पण वाचेल! प्रतिसादासाठी त्याला फक्त एक क्लिकच  करावे लागेल!
सध्या जो fb like पर्याय आहे त्यात वाचकाला प्रथम fb वर लॉग इन करून नंतरच त्याचा प्रतिसादाची नोंद होते!

मिलिंद कुंभारे  :) :) :)

विक्रांत


मिलिंद कुंभारे

मला वाटतं कवितांना व MK ला जास्त प्रतिसाद मिळण्यासाठी काहीतरी events समूहावर राबवायला हवेत ......


Madhura Kulkarni

मला वाटत, कि लोक प्रतिसाद देतायत का नाही, ते महत्वाच नाही.....आपण लिहितो त्या कविता, साहित्य, लेख हे प्रेक्षकांपर्यंत पोचतायत, का नाही, हे महत्वाच आहे.


प्रतिसाद, लाईक ह्या गोष्टी आपल्याला नवीन कविता करायला उत्साह देतात; पण 'कर्म करा फलिताची चिंता करू नका' अस स्वयं देवानेही म्हणाले आहे.
मग 'लाईक' मिळावा म्हणून एव्हडा खटाटोप का?

आणि आपल्या कविता इतरांपर्यंत पोचल्या, त्यांना त्या आवडल्या, तर प्रेक्षक नक्कीच उस्फुर्त प्रतिसाद देतील, अस मला वाटत.

त्यामुळे आपल्याला सध्याच्या परिस्थितीत बदल करायचा असेल तर प्रथमतः आपण प्रत्येक कवितेवर 'लाईक' आणि 'रिप्लाय' दिला पाहिजे.

आपण देतो का?
खर बोलायला गेल तर नाही. कारण कधी आपल्याला वेळ नसतो तर कधी ती कविता आवडत नाही.
मग 'क्रांती' आपल्यापासूनच सुरु करूया. प्रत्येक कवितेवर प्रतिक्रिया द्यायला सुरवात करा.   :)

:)    :)    :)


Çhèx Thakare

pratisad den kiva n den he savistar vachakavr depend aste n jar kavita chan asli tr tumala tyachi poch pavti nakki milel pan ti poch pavti tumi konakade svatahun nye magu shakat pn , n mala avdte mhanun me kavita lihato n tya tumala avdtat he bagun mala anand hoto pn apn konavr balajabri nye karu shakt he sudha apn samjun ghyayla have n kshama asavi jar kahi chukale asel tr