कविता कशी लिहावी!

Started by मिलिंद कुंभारे, March 23, 2013, 10:14:14 AM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे


जागून रात्रभर मी बसतो जिच्या उशाशी
ती आठवण तुझी अन, मीही तुझाच आहे.....

nice gazal, I liked it.....जबरदस्त...

मिलिंद कुंभारे

#111
पुन्हा एक प्रयत्न गझल लिहिण्याचा...
वृत्त भुजंगप्रयात.....
ल गा गा    ल गा गा    ल गा गा    ल गा गा
१  २  २     १  २  २     १  २  २     १  २  २

कशी गीत गाऊ?

कळेना कधी गुंतले, संपले मी
तरीही कुठे बावरी, चालले मी ...

जरी पारखी मी तुझ्या संगतीला
सुखांशी तरीही जणू भांडले मी ...

जराशी जराशी अता राहिले मी
व्यथा, वेदनांनी जणू वेढले मी ...

जुनेरे कसे गीत गावे नव्याने?
अता आटली आसवे, गोठले मी ...

कसे आवरू सावरू मी स्वत:ला
कळेना कधी थांबले, भंगले मी ....

किती देत राहू मला मी दिलासे
तुझ्या आठवांनी मला जाळले मी ....

मिलिंद कुंभारे

sweetsunita66


मिलिंद कुंभारे


मिलिंद कुंभारे

पुन्हा एक प्रयत्न गझल लिहिण्याचा...

वृत्त : आनंदकंद ( गागाल गाल गागा-- गागाल गाल गागा )

स्वप्नामधेच का रे तू भेटशी?

आयुष्य थांबल्याचा हलकाच भास झाला
तेव्हा सुरु नव्याने माझा प्रवास झाला ....

स्वप्नामधेच का रे तू भेटशी? कळेना!
प्रत्येक रात्र, दिनही माझा उदास झाला ....

माझ्या मनास वेड्या चाहूल लागली अन् 
असशील भोवती तू हळुवार भास झाला ....

शोधीत श्वास, गंधित क्षण ते, तुझ्यात होते
पण व्यर्थ का असा रे सारा प्रयास झाला ....

मी जीवना तुझा रे! जेव्हा हिशोब लिहीला
त्याचा उगाच माझ्या जगण्यास त्रास झाला ....

मिलिंद कुंभारे

shashaank

मिलिंद , मस्त गजला लिहितोस की रे ....
पण मला गजलांच्या तांत्रिक गोष्टी माहिती नसल्याने त्याबद्दल काही बोलू शकत नाही - ते कोणा गजल-जाणकाराकडून विचारुन घे ....

मिलिंद कुंभारे


shashaank

 '' नभ निळे ''

पृथ्वी वृत्त : '' नभ निळे ''
(लगाल ललगा लगा लललगा लगागा लगा )

विमान उचले जरा जडशिळा रुपेरी कुशी
गती भरत यंत्रणा थरथरे अवाढव्यशी
सहास्य परिचारिका सुवसना करे आर्जवा
''सुटे धरणिबंध हा पथिकमित्रहो सज्ज व्हा''

जसे हळुहळू चढे वर विमान वेगे उठे
घरे नगर कार्यक्षेत्र पथजाल मागे सुटे
क्षणैक नजरेपुढे झरझरा नकाशा सरे
विशाल तिमिरावरी विरळ रोषणाई उरे

उडे शकट एकटा नवनव्या प्रदेशांवरी
किती प्रहर नेणिवेत झरती उदासीपरी
अधांतरच आपले घर नवे मनाला गमे
गवाक्ष पडद्यामधे लपत शर्वरी आक्रमे

सरे समय नाकळे असत नीज की जागृती
तशात परिचारिका दिसत भास-शी आकृती
नसेच पण भास तो, हसत ती करे स्वागता
''उठा दिवस हा शुभंकर असो तुम्हा सर्वथा ''

गवाक्ष उजळे दिसे उगवती धरे लालिमा
अपार नभपोकळीत झळके नवा नीलिमा
कुठे पुसट पुंजके ढग असे वहाती सुखे
असा दिन महोत्सवी नयन पाहती कौतुके

नभात नभ गुंतले नभ नभामध्ये लोपले
नभास नभ भेटले नभ नभावरी लोटले
निळे नितळ मोकळे झळकते नभाचे तळे
किती उजळ कोवळे चमकती दिशांचे मळे

प्रवास असती किती कुठुनसे कुठे जायचे
मला निखळ वैभवी क्षण असे सवे न्यायचे
असो कलह तल्खली गलबला जिवाभोवती
परंतु एकट क्षणी नभ निळे मला सोबती ..

- भारती बिर्जे डिग्गीकर

मिलिंद कुंभारे

नभात नभ गुंतले नभ नभामध्ये लोपले
नभास नभ भेटले नभ नभावरी लोटले....

छान..... :)

shashaank

हस्तांतर

विसर्जनासाठी गणपती नेताना
मला मूर्ती जड झाली, तेव्हा
उसळत्या तारुण्याचा
माझा मुलगाच मला म्हणाला: द्या इकडे.

मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली
चौरंगासहित.
मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून, तर
मी एका दैवी आनंदात अकल्पित
परंपरा पुढे सरकल्याच्या..

मी पुन्हा तरूण ययातीसारखा;
माझा मुलगा जख्ख म्हातारा,
परंपरेच्या ओझ्याने वाकलेला..

- प्राक्तनाचे संदर्भ, द. भा. धामणस्कर