कविता कशी लिहावी!

Started by मिलिंद कुंभारे, March 23, 2013, 10:14:14 AM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे

#90
krishnakumarpradhan,
धन्यवद...
संधिकाली मंतरलेल्या  ह्या ऐवजी सांज ही मंतरलेली  असे लिहीले असते असे मला वाटते

पण असे लिहिले तर यमक जुळत नाही ....

आर्त स्वर ऐक जरा,
संधीकाली मंतरलेल्या  ......

आर्त स्वर ऐक जरा,
सांज ही मंतरलेली...

संधीकाली मंतरलेल्या  ...... पण ह्यात ९ अक्षरे येतात ....८ अक्षरांची ओळ सुचवा ..... :(

किंवा असे लिहिले तर......

घे न्हाहून  चांदराती,
सांज ही मंतरलेली,
आर्त स्वर ऐक जरा,
नको विझवू तारका....

किंवा असे

सांज ही मंतरलेली,
घे न्हाहून चांदण्यांनी,
आर्त स्वर ऐक जरा,
नको विझवू तारका....

krishnakumarpradhan

धन्यवाद,तुम्ही सुचविलेल्या पर्यायांपैकी शेवटून दुसरा पर्याय अधिक चांगला वाटतो
(घे न्हाऊन चांदराती,
सांज ही मंतरलेली.
आर्त स्वर ऐक जरा,
नको विझवू तारका)

shashaank

अष्टाक्षरी रचताना मनात ती गुणगुणून पहावी. तसेच वेगवेगळे समानार्थी शब्द जर माहिती असतील तर कुठला शब्द चपखल(नेमका) बसेल हेदेखील लक्षात येऊ लागेल. त्यामुळे हा सगळा सराव, अभ्यासाचाही भाग आहे.

मनात कल्पना आली आणि ती कागदावर जशीच्या तशी उतरवली तर ते काव्य होऊ शकत नाही.
स्व. शांताबाईंसारख्या (श्रीमती शांताबाई शेळके) मान्यवर व्यक्तिनेही हे लिहून ठेवले आहे. त्यांनी सिनेमा/ नाटके यात जी गीते लिहिली ती केवळ असामान्य प्रतिभेच्या जोरावर नाहीत तर अर्थ, लय, नेमके शब्द असा सगळा ताळमेळ जमवूनच. हे काव्य लिहिताना खटाटोप (शब्द, ओळी मागे पुढे करणे) करावाच लागतो - हाच अभ्यास. अनेक प्रकारची काव्ये (अगदी अभंग, बालगीते, मोरोपंतांच्या आर्या, इ.) वाचत गेलो आणि कुणा जाणकार रसिकाकडून जर हे समजावून घेतले तर ते सहज लक्षात येईल.


याचे अगदी सुंदर उदाहरण म्हणजे - वल्हव रे नाखवा रे वल्हव रे - हे कोळी गीत असल्याने यातले सर्व शब्द हे त्या कोळीजीवनाशी निगडितच आहेत. याला जी एक लय आहे तीदेखील होडीत बसून आपण डोलत आहोत अशी जाणवणारी. (अर्थातच संगीतकाराचे कर्तृत्व त्यात आहेच)

वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा

मी डोलकर डोलकर, डोलकर दर्याचा राजा
घर पान्यावरी बंदराला करतो ये जा !

आयबापाची लाराची लेक मी लारी
चोली पीवली गो नेसलंय अंजीरी सारी
माज्या केसान गो मालीला फुलैला चाफा
वास परमालता वार्‍यानं घेतंय झेपा
नथ नाकान साजीरवानी
गला भरुन सोन्याचे मनी
कोलिवार्‍याची मी गो रानी
रात पुनवेला नाचून करतंय्‌ मौजा

या गो दर्याचा दर्याचा दर्याचा दरारा मोठा
कवा पान्यावरी उठतान डोंगरलाटा
कवा उदानवारा शिराला येतंय्‌ फारू
कवा पान्यासुनी आबाला भिरतंय तारू
वाट बगून झुरते पिरती
मंग दर्याला येतंय्‌ भरती
जाते पान्यानं भिजून धरती
येतंय भेटाया तसाच भरतार माजा

भल्या सकालला आबाल झुकतं हे खाली
सोनं चमचमतं दर्याला चढते लाली
आमी पान्यामंदी, रापण टाकतो जाली
धन दर्याचं लुटून भरतो डाली
रात पुनवेचं चांदनं प्याली
कशि चांदीची मासली झाली
माज्या जाल्यात होऊन आली
नेतो बाजारा भरून म्हावरां ताजा


त्याच शांताबाईंनी "तोच चंद्रमा नभात" यात अनेक संस्कृतप्रचुर शब्दांचा वापर केलाय - यात रात्रीचे जे एक विलक्षण वातावरण आणि त्या काव्यातील एक आर्तता निर्माण झालीये ती त्या शब्दांनीच  -

तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी
एकांती मज समीप तीच तूहि कामिनी !

नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे
जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी

सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे ?
मीहि तोच, तीच तूही, प्रीति आज ती कुठे ?
ती न आर्तता उरात स्वप्‍न ते न लोचनी

त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा
गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी

याच शांताबाईंनी  -
"रेशमाच्या रेघांनी" - ही लावणी लिहिताना अस्सल ग्रामीण बाज असलेले शब्द वापरलेत.  यात लावणीचा ठसका आहे तो त्या शब्दांमुळेच.

रेशमाच्या रेघांनी, लालकाळ्या धाग्यांनी
कर्नाटकी कशिदा मी काढिला
हात नगा लावू माझ्या साडीला !

नवी कोरी साडी लाखमोलाची
भरली मी नक्षी फूलयेलाची
गुंफियलं राघूमोर, राघूमोर जोडीला
हात नगा लावू माझ्या साडीला !

जात होते वाटंनं मी तोर्‍यात
अवचित आला माझ्या होर्‍यात
तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला ?
हात नगा लावू माझ्या साडीला !

भीड काही ठेवा आल्यागेल्याची
मुरवत राखा दहा डोळ्यांची
काय म्हणू बाई बाई, तुमच्या या खोडीला
हात नगा लावू माझ्या साडीला !


shashaank

(गीतकार - पी. सावळाराम, गायिका - आशाबाई, संगीत - वसंत प्रभू)

राधा गौळण करिते मंथन
आविरत हरिचे मनात चिंतन

सुवर्ण चंपक यौवन कांती
हिंदोलत ती मागे पुढती
उजव्या डाव्या झुलत्या हाती
कृष्ण कृष्ण ते बोलत कंकण

नाद मुरलीचा पडता कानी
बावरली ती गोकुळ हरिणी
छुमछुम छंदी घुंगूर चरणी
गुणगोविंदी गेली रंगून

राधेविण ते मंथन चाले
नवल बघाया नवनित आले
ध्यान तियेचे उघडी डोळे
दृष्टी पुढती देवकीनंदन

पी. सावळाराम यांनी लिहिलेले हे एक सुंदर भावगीत (भक्तिगीतही म्हणता येईल). आशाबाईंनी फार गोड गायले आहे हे.

गोकुळातली राधा गौळण ताक घुसळते (मंथन करणे) आहे. राधा ही कृष्णाची अंतरंग सखी. त्यामुळे राधा-कृष्ण असेच अजूनही म्हटले जाते. ती सतत (अविरत) कृष्णचिंतनात मग्न असल्याने नेहेमीच्या कामातही तिला कृष्णच दिसत असे - त्यामुळे ते मंथन करताना तिच्या बांगड्यांमधुनही (कंकण) कृष्ण कृष्ण असा आवाज येतो आहे.
ती कृष्णचिंतनात इतकी मग्न झाली आहे की मग राधेशिवाय (राधेविण) मंथन करतंय तरी कोण हे पहायला नवनीत (लोणी) वरती आलंय - अशी अति सुंदर, अति तरल भावना या ज्येष्ठ कविने कशी बहारीने लिहिली आहे पहा -
राधेविण ते मंथन चाले
नवल बघाया नवनित आले
दही ढवळताना हळुहळु ताक खाली राहून लोणी वर तरंगायला लागते या वस्तुस्थितीचा आधार घेउन कविने ते या ओळीत कसे सुरेखरित्या मांडले आहे पहा...


लतादीदी / आशाबाई यांचे अति गोड स्वर, पी. सावळाराम यांची सुरेल आशयपूर्ण गीते आणि वसंत प्रभू यांचे बहारदार संगीत यांनी एक काळ फारच गाजवला होता  (१९५०-६०).
आत्ताच्या पिढीला जरी हे माहित नसले तरी ही जुनी गाणी त्यांच्या आई-वडिलांनी अथवा आजी-आजोबांनी नक्कीच मन लावून ऐकली होती - त्यांच्या ती अजून स्मरणातही नक्कीच असतील.....

हे गाणे जर कोणी अजून ऐकले नसेल तर जरुर ऐका - या गाण्याची गोडी अगदी अवीट आहे.


shashaank

#94
श्री. विनायक उजळंबे यांची एक साधी-सोपी पण अति तरल रचना ---

कवितेला असं लागतच काय?
हिरवं पान ..हिरवं देठ..अन भावुक सखिची गळा भेट..

कवितेला असं लागतच काय?
थोड़ा पाउस..थोडंस उन ..अन तिचा कटाक्ष हसून ..

कवितेला असं लागतच काय?
फुललेलं फुल..खुलणारी कळीं..अन तिच्या गालावरची खळीं..

कवितेला असं लागतच काय?
भिजली वाळु..फेसाळती लाट..अन तिच्या कुशितली पहाट..


ruturaaj

This discussion and various examples seems to be quite interesting.

Thank to all the participants.

Thanks to ADMIN for giving top priority to it. Keep it up.

मिलिंद कुंभारे


मिलिंद कुंभारे

शशांक,
एखादी कविता वृत्तात लिहायची असेल तर सर्वात सोपे वृत्त कोणते?
मी चार ओळी शार्दुल विक्रीडीत ह्या वृत्तामध्ये लिहायचा खूप प्रयत्न केला पण जमलेच नाही ...
फारच घोळ होतोय ....
कधी  मात्रा जुळतात पण लय येत नाही ....
कधी मात्रा जुळतात, लय येते पण भाव व्यक्त होत नाही ....
:(

krishnakumarpradhan

जा जा लाकूडतोड्या,करिसी तू काय कर्म बापा हे
  हे व्रुत्त कोणतेय़

krishnakumarpradhan

माता वाट पहात बसली,  आहे गड्या ती घरी
जा जा शेवटची गाडी सूटण्या,पूर्वी तिला रे धरी