कविता कशी लिहावी!

Started by मिलिंद कुंभारे, March 23, 2013, 10:14:14 AM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे

#70
shashaank,

thanks...... :)

शशांक,
मला वाटतं बहुतेक नवीन कवींचा कल  यमक जुळवण्या कडे जास्त असतो, मात्र लयीकडे दुर्लक्ष होतं, हे ह्या उदाहरणामधून समजतंय......

एक शंका ....
प्रत्येक कविता हि गुणगुणता यायलाच पाहिजे का? कविता आणि गाणे ह्यात  काय फरक असतो?

vinod.patil.12177276

milindji khupach anmol maheeti ...dhanyavaad.

मिलिंद कुंभारे

#72
गूढ जीवनाचे

वळणे जीवनी
कितीच असती
कधी  साधे सोपे
काही आड रस्ते

कंपने  धरणी
उधाण सागरी
भय ते मृत्यूचे
मज क्षणोक्षणी

कधी वाटतसे
स्वच्छंदी जगावे
घ्यावे ठरवून
आयुष्य आपले

गीत जीवनाचे
तुजसवे गावे
गूढ जगण्याचे
उमजून घ्यावे

मिलिंद कुंभारे
षडाक्षरी लिहिण्याचा एक प्रयत्न .......जमलंय का सांगा....
:'( :'( :'(

sweetsunita66

छान षडाक्षरी आहे मिलिंद !मी मात्र गोंधळात पडते लिहितांना , :) :) :)

मिलिंद कुंभारे

#74
sweetsunita,

thanks....... :)


vijaya kelkar

  श्रावण
     
        वसंताची तान
        ग्रीष्माची तहान
        वर्षा पानोपान
          सांतवन ____

       श्रावण मासात
       बरसे क्षणात
       तळपे क्षणात
         आसमान _____

       ओली हिरवळ
       पाणी खळखळ
       कवळे-कवळे
          ताज ऊन ____

       रंगाची कमान
       न मदनबाण
       रती रममाण
          एक जान ___

                    विजया केळकर __


     
     

vijaya kelkar

       'श्रावण'    षडाक्षरी जमली कां ?

मिलिंद कुंभारे

vijaya kelkar... :)

छान आहे ....  :)
पण हा अभंग वाटतो .... ६,६,६,४ ...
षडाक्षरी नाही ....
मला वाटतं शशांक ह्यावर योग्य प्रतिक्रिया देऊ शकेन ... 

सुरुवातीला मी  माफी मागेल  जर माझ्याकडून काही  चुकी झाली बोलण्यात तर ..
पण  केदारजींनी  जे सांगितले  ते योग्यच आहे .... आणि  कविता  प्रत्येकालाच      आवडते असे नाही  पण ज्याला आवडते  त्याला त्यात काही गोष्टी आपल्यास्या वाटतात .
प्रत्येकालाच कविता लिहायला जमते असे नाही , आणि  कवितेचा मूळ हेतूच  असावा कि आपले मन मोकळे करणे ...........

मूळ मुद्दा हा आहे कि  त्याने  आपल्या किंवा इतरांच्या कविता पाहून चार ओळी  स्वतः लिहण्याचा प्रयत्न केला हे  खरे यश म्हणावे  ... मग त्या  तुटके मुटके असोत ..
कारण मला वाटतं कविता म्हणजे आपल्या भावना ज्या शब्दांमध्ये उतरवल्या जाऊन त्या वाचताना मनाला पटतात ...  पण ही कला सर्वांनाच अवगत नसते  तो जो काही  प्रयत्न करतो त्याला मदत हि  ज्ञानी व्यक्तीने करायलाच  हवी ....

आणि कवितेत अलंकार असावेच  पण  ज्यांना ते जमत नाही त्याने सोप्या शब्दांतही लिहले तरी काही हरकत नसते  असे मला वाटतं ...........
कारण प्रत्येक गाणं आपण गझल म्हणून ऐकत नसतोच  ना ...........


shashaank

 'श्रावण'    षडाक्षरी जमली कां ? >>>> ही षडाक्षरी नाहीये - अभंग आहे .

षडाक्षरीत तालाला महत्व आहेच जसे सहा अक्षरांना आहे तसेच...

माझीच एक रचना देतोय -

वैशाख वणवा
पेटला नभात
रानात, भुईत
काहिली अंगात

कोरड्या रानात
कोळपली पात
जाळतो भास्कर
फुफाटे धुळीत

चैत्राची पालवी
डोलते भरात
पळस पांगारा
फुलतो रानात

येतसे भरात
वैशाख मिरास
कोवळ्या पानांची
नाजुक आरास

जागोजाग तुरे
फुलती रुखात
रंगीन वैशाख
खुलतो तोर्‍यात

मधुर गंधाचा
मोगरा भरात
रातीची नक्षत्रं
फुलती वेलीत

ओलावा मातीचा 
हिरावून नेत 
जागोजाग भेगा
भुईच्या उरात   

दिवसा जाळोनी
थकतो वैशाख
घेऊन निद्रिस्त
गारवा कुशीत

दूर त्या रानात
आभाळा बघत
आशा पावसाच्या
कोरड्या डोळ्यात .......

हे म्हणताना ठेका लक्षात येईलच. सहा अक्षरांबरोबर तो ठेका/ लय महत्वाची.