कविता कशी लिहावी!

Started by मिलिंद कुंभारे, March 23, 2013, 10:14:14 AM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे


मिलिंद कुंभारे

#61
पुरे कल्लोळ शब्दांचा....

पुरे कल्लोळ शब्दांचा,
मज वाटतसे आता,
छन्द, वृत्त यमकांचा,
ध्यास नुसता धरावा !!

पुरे खेळ भावनांचा,
कविताच श्वास माझा,
एक रचता रचना,
लय मिळावी शब्दांना !!

पुरे मुक्तछन्द आता,
एक लिहावी कविता,
सूर जुळता शब्दांना,
मजा लुटावी गातांना!!

शशांक, आता जमलंय का ????? :'(

मिलिंद कुंभारे

गुज माझिया मनीचे......

स्तब्ध सारी राने वने,
स्तब्ध नदीचे किनारे,
सांग सखी छेडू कसे,
तुज प्रीतीचे तराणे.......

भन्नाट वाहती वारे,
बेधुन्दशी पाने फुले,
प्रिये तुज सांगू कसे,
गुज माझिया मनीचे......

सांज वेळी नभ निळे,
चंद्र, संगती चांदणे,
सजणी थांबवू कसे,
ऋतू नयनी दाटले ......

मिलिंद कुंभारे
शशांक, जमलंय का ????   :'(

vinod.patil.12177276

शशांक सर ,मिलींदजी तुमच्या चर्चेमुळे खुपच अनमोल माहीती मिळाली.मनापासुन धन्यवाद .गझल कशी लिहावी याबद्दल चर्चा करावी.मलाही गझल लिहीता यावी असं मनोमन वाटतं.कालच मी पहिल्यांदा प्रयत्न केला गझल लीहायचा पण अगदी जुजब्या माहितीच्या आधारावर.गझले चे नियम,मांडणी याची माहिती सांगावी.धन्यवाद .

shashaank

कविता
-शाम | 31 July, 2013 - 18:36
त्याच्या मनात येते तेंव्हा
तोही लिहतो मातीमध्ये
नांगरलेल्या रेघेवरती
बैलासंगे त्याची कविता

माळावरती गाळावरती
भाळावरती काळावरती
अक्षर अक्षर पेरत जातो
कातडीतली शाई सांडत

वृत्ते यमके छंद मुक्तके
या सार्‍यांच्या पल्याड उगते
संगणकाच्या खिडकीमधुनी
ना दिसणारी हिरवी कविता

भरल्यापोटी ओठी यावे
इतके नसते सोपे गाणे
कोणासाठी शब्द सोयरे
कोणासाठी कविता भाकर

------------------------------शाम


Please read this poem, I am totally speechless ........

मिलिंद कुंभारे


vinod.patil,

गझल कशी लिहावी ह्याबद्दल मला फारसे द्यान नाही ....
कुणाला ह्याबद्दल माहित असल्यास ह्या लिंक वर सविस्तर पोस्त करावे हि विनंती ....  :(

मिलिंद कुंभारे

भरल्यापोटी ओठी यावे
इतके नसते सोपे गाणे
कोणासाठी शब्द सोयरे
कोणासाठी कविता भाकर


shashaank,
अप्रतिम.......
आवडलीय हि हिरवी कविता......मनात काहूर निर्माण करणारी ....


sweetsunita66

त्याच्या मनात येते तेंव्हा
तोही लिहतो मातीमध्ये
नांगरलेल्या रेघेवरती
बैलासंगे त्याची कविता

माळावरती गाळावरती
भाळावरती काळावरती
अक्षर अक्षर पेरत जातो
कातडीतली शाई सांडत  :) :) :) :)shashaank,nice poem

मिलिंद कुंभारे

#68
vinod.patil,

एकाच वृत्तातील, एकच यमक (काफिया) व अन्त्ययमक (रदीफ) असलेल्या प्रत्येकी २-२ ओळींच्या किमान पाच किंवा त्याहून अधिक कवितांची बांधणी म्हणजे गझल........

चंद्र आता मावळाया लागला
प्राण माझाही ढळाया लागला
काय तो वेडा इथेही बोलला
हा शहाणाही चळाया लागला?
हाक दाराने मला जेव्हा दिली
उंबरा मागे वळाया लागला

for detail information follow this link.....
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%9D%E0%A4%B2

shashaank

भन्नाट वाहती वारे,
बेधुन्दशी पाने फुले,
प्रिये तुज सांगू कसे,
गुज माझिया मनीचे......

वारे भन्नाट वाहती
बेधुन्दशी पाने फुले,
प्रिये तुज सांगू कसे,
गुज माझिया मनीचे...



सांज वेळी नभ निळे,
चंद्र, संगती चांदणे,
सजणी थांबवू कसे,
ऋतू नयनी दाटले ......

सांज वेळी नभ निळे,
चंद्र, संगती चांदणे,
कसे सजणी थांबवू
ऋतू नयनी दाटले ...


Lay laxaat ghene - "are sansaar sansaar"