कविता कशी लिहावी!

Started by मिलिंद कुंभारे, March 23, 2013, 10:14:14 AM

Previous topic - Next topic

shashaank

इथे प्रशांत शिंदे म्हणतात ते अगदी बरोबर. प्रत्येकामधे कुठली ना कुठली कला असतेच. त्या कलेमधून आपण व्यक्त / अभिव्यक्त होत असतो, मन मोकळे करत असतो.
फक्त एक गोष्ट आहे - त्या त्या कलेतील काही तांत्रिक (टेक्निकल) गोष्टी असतात - त्या जाणून घेणे आवश्यक असते - त्यामुळे हिरा असला तरी पैलू पाडल्यावरच झळकतो - तसेच हे आहे.
तरीही - प्रशांत म्हणातात ते बरोबर आहे - पण  ज्यांना ते जमत नाही त्याने सोप्या शब्दांतही लिहले तरी काही हरकत नसते  असे मला वाटतं ......


vijaya kelkar


    मिलिंद,प्रशांत आणि शशांक ...नमस्कार
  प्रथम मनापासून आभार ..शशांकनी तर उदाहरणासाहित छान समजावून दिले आहे .
वैयक्तिक म्हणायचे तर माझ्या आसपास कवितेवर बोलणारे ,समजणारे वा समजावून देणारे कोणी नाही .मग येथे कविता पाठविणे आवडते.
योग्य अभिप्राय व प्रतिसाद मिळतो. अनेक उत्तम कवितांचा आस्वाद घेता येतो
                 

krishnakumarpradhan

#82
खरे तर या विषयावर लिहिण्याचा मला अधिकारच नाहिपम मि कविता लिहिण्यास सुरवात केलि त्यावेळचे विचार ह्या कवितेत आहेत ति कविता इथे देतो आहे                                             
              नवकविचि व्यथा (अष्टाक्षरि)         
अशि कशि छंदोमयि       
करणार मि कविता
धडपड चालु राहि
जोवरि चंद्र सविता

अक्षरे मोजकि हवि         
एक ना जास्त वा कमि
शब्द उलटेपालटे
कसेहि करणे चाले

असे शब्द निवडावे   
सिमित अक्षरा भावे
अर्थास त्यातुनि घ्यावे   
कसेतरि समजोनि     

भाव मुके ति कविता   
नॆसर्गिकता नुरता     
लागते असे बोलाया   
कविंनो तुम्हि कां विता
(दिर्घ इकार इथे टाइप करता येत नाहि,जरुर तेथे दुरुस्ति करुन ध्यावि--कवि क्रुष्णकुमार प्रधान)

मिलिंद कुंभारे

कवि क्रुष्णकुमार प्रधान....

दिर्घ इकार इथे टाइप करता येत नाहि,जरुर तेथे दुरुस्ति करुन ध्यावि--
मराठी typing साठी हि लिंक वापरून बघा.....

http://www.google.com/intl/mr/inputtools/cloud/try/


मिलिंद कुंभारे

#84
शशांक,
पुन्हा एक अष्टाक्षरी लिहायचा प्रयत्न, त्रुटी आढळल्यास अवश्य कळवा .... :'(


गुंतल्या रे वेड्या मना

बघ तू नयनी माझ्या,
तोच धुंद पावसाळा,
घे चिंब भिजून जरा,
देह तो तहानलेला ......

छेड तू पुन्हा एकदा,
नाजुकश्या पाकळ्यांना,
बघ आठवून जरा,
क्षण तो शहरालेला ......

सख्या नकोस  हरवू ,
गहिऱ्या धुक्यांत असा,
बघ पल्याड जरासा,
ऋतू तो बहरलेला ......

घे न्हाहून  चांदराती,
नको विझवू तारका,
आर्त स्वर ऐक जरा,
संधीकाली मंतरलेल्या  ......

नको रोखू श्वास असा,
गुंतल्या रे वेड्या मना,
सोड अंधार मनीचा,
घे जरा लांब उसासा ......

मिलिंद कुंभारे



मिलिंद कुंभारे

#85
प्रशांत शिंदे...

हिरा असला तरी पैलू पाडल्यावरच झळकतो.....

ज्यांना ते जमत नाही त्याने सोप्या शब्दांतही लिहले तरी काही हरकत नसते ....
पण एखादी कविता वृत्त, मात्रा, अलंकार सांभाळून पण करून बघावी ......

shashaank

स्वैर त्याची ही कहाणी...
- बागेश्री

आला आला हा पाऊस
नको एकटी जाऊस,
सखे, उनाड हा द्वाड
तुज पाडेल भरीस...
जरी सखा हा लाडका
पण नाठाळ गं भारी,
सांभाळून वाट चाल
आहे लबाड रंगारी..

स्वैर रूप तो धारिता
राधा तूही रंगशील,
रंग त्याचा तुझा एक
कशी विलग होशील?
बरसेल आसुसून
तुज करील बेधुंद,
परि सावर स्वतःला
नको होऊस बेबंद..

क्षणी भान तू हरता
त्याचे आयते फावेल,
चिंब तुजला करून
मनाजोगते साधेल...
वारा मदतीस त्याच्या,
तुझा पदर ढाळाया..
धाव- धावशील कोठे?
चराचरी त्याची माया

तुझे वेड त्याला आहे,
जशी त्याची तू दिवाणी
परि जप तुज सखे,
लाज राखूनिया मनी...
आज इथे उद्या नाही,
स्वैर त्याची ही कहाणी
मग झुरशील पुन्हा
गात विरहाची गाणी...!!

( http://venusahitya.blogspot.in/2012/09/blog-post.html)

ही अजून एक अष्टाक्षरी - अशा रचना वाचताना लक्षात येईल की लयीत कशी सुरेख बांधली आहे ही अष्टाक्षरी. अष्टाक्षरीत आठ अक्षरांबरोबर लयीलाही फार महत्व आहे. नुसती आठ अक्षरे वा दुसर्‍या आणि चौथ्या ओळीतील यमक साधणे म्हणजे अष्टाक्षरी नाही. या दोन्हींबरोबरच लयही तितकीच महत्वाची आहे.


shashaank

वर मिलिंदने जी अष्टाक्षरी दिली आहे तीच जराशी बदलली की नीट लयीत येते-
अशी -


बघ नयनी तू माझ्या
तोच धुंद पावसाळा
भिजून घे चिंब जरा
देह असा तहानेला


छेड पुन्हा एकदा तू
नाजुकशा पाकळ्यांना
बघ आठवून जरा
शहारल्या त्या क्षणांना


all the best.....

krishnakumarpradhan

गुंतल्या रे वेड्या मनी ही कविता वाचली.त्यात संधिकाली मंतरलेल्या  ह्या ऐवजी सांज ही मंतरलेली  असे लिहीले असते असे मला वाटते

मिलिंद कुंभारे

#89
शशांक,
धन्यवद...


छेड पुन्हा एकदा तू
नाजुकशा पाकळ्यांना
बघ आठवून जरा
शहारल्या त्या क्षणांना..


हे अगदीच लयीत वाटते ....
पण मला असे लयीत लिहायला जमेल का थोडी शंकाच वाटते....