माझ्या निवडक चारोळ्या - सनिल पांगे

Started by सनिल पांगे....sanilpange, October 07, 2016, 12:04:04 PM

Previous topic - Next topic

सनिल पांगे....sanilpange


हवव्यास नाही माझी
जे हजारांचा व लाखाचं आहे
भुकेलेला असलो तरी तेच खातो
जे माझ्या हक्काचं आहे
@ सुनील पांगे

सनिल पांगे....sanilpange

#31
वहीच्या शेवटच्या पानाची
इवलीशी होडी होणार होती
आजवर अक्षरांशी पण कागदाची
आज पाण्याशी जोडी होणार होती
@ सनिल पांगे


सनिल पांगे....sanilpange

थोडा फार जो उरला आहे
तो विश्वासही गुदगे टेकत आहे
माझ्या कडून जगण्याचा प्रयास नाही
श्वास श्वासाला फुंकत आहे
@सनिल पांगे


सनिल पांगे....sanilpange

#33
आपण अंदाज बांधतो
घेतलेला निर्णय बरोबर
पण नियतीची बांधणी असते
आपण निर्णय घेण्या अगोदर
@ सनिल पांगे

सनिल पांगे....sanilpange

#34
माझ्या नजरेतून बघ
प्रेमाचं विश्व किती सुंदर आहे
फुलांची सारेच कदर करतात
इथे काट्यांचाही आदर आहे
@ सनिल पांगे

सनिल पांगे....sanilpange

#35
विश्वास या शब्दातच
"विष" व "श्वास" एकत्र आले
ज्यांना अनूभव आला त्यांनी हेरलं
ते किती सावत्र निघाले
@ सनिल पांगे