माझ्या निवडक चारोळ्या - सनिल पांगे

Started by सनिल पांगे....sanilpange, October 07, 2016, 12:04:04 PM

Previous topic - Next topic

सनिल पांगे....sanilpange

माझ्या काही निवडक चारोळ्या ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील.  आपला अभिप्राय नक्की कळवा
प्रयत्नांच्या दोन पायरीं मधलं
अंतर तसं नाही फार
म्हणटलं तर चढण आहे
म्हणटलं तर उतार
@ सनिल पांगे

सनिल पांगे....sanilpange

"प्रेम" .... शब्द दोन अक्षरांचा
नुसता ऐकला तरी हर्ष होतो
आणि उच्चारला तर
दोन ओठांमध्ये स्पर्श होतो
@सनिल पांगे


सनिल पांगे....sanilpange

आज तुला पाहूनही मी
न पाहील्या सारखं केलं होतं
कालच माझ्या भावनांच प्रेत
माझ्याच पुढून गेलं होतं
@ सनिल पांगे

सनिल पांगे....sanilpange

एक सुख उपभोगलं की
दुसऱ्याचा शोध घेतो आपण
इथे सारचं क्षणभंगूर
जबरदस्त बोध घेतो आपण
@ सनिल पांगे

सनिल पांगे....sanilpange

खरं सांगा.. ‍ जिवन जगताना
सोप्पे प्रश्न अवघड होतात ना
सुख उडते भुर्कन, पण
दुःखाचे पाय जड होतात ना
@ सनिल पांगे

सनिल पांगे....sanilpange

जिवन म्हणजे नेमकं काय
जिवनालाच प्रश्न विचारून पाहीला
उत्तर मिळालं नाही नि
माझ्या सोबत प्रश्नचिन्हेत राहीला
@ सनिल पांगे

सनिल पांगे....sanilpange

तू रागावून गेलास तेव्हा,
आभाळा इतकं दु:ख दाटलं
नाही विसरू शकले तुला
दु:खात आभाळ नित्यानं साठलं
@ सनिल पांगे

सनिल पांगे....sanilpange

निस्वःर्थ मनाने देवापुढे
जिवनात एकदा तरी मान झुकावी
कोण जाणो तेहत्तीस कोटींपैकी
निदान एकाने तरी हाक ऐकावी
@ सनिल पांगे

सनिल पांगे....sanilpange

तू येण्या आधी
तुझं स्वप्न येऊन जाते
मी तुला भेटतच नाही
तुझ्या आधीच ते मला घेऊन जाते
@ सनिल पांगे

सनिल पांगे....sanilpange

खरं सांगा.. ‍ जिवन जगताना
सोप्पे प्रश्न अवघड होतात ना
सुख उडते भुर्कन, पण
दुःखाचे पाय जड होतात ना @ सनिल पांगे