चारोळी ला चारोळीने उत्तर.

Started by Rahul Kumbhar, July 07, 2010, 02:25:58 PM

Previous topic - Next topic

Rahul Kumbhar

ह्या पोस्ट मध्ये एका चारोळीचे उत्तर चारोळीने द्याची... चला तर करुया सुरु...कोण पहिल सुरु करेल..

Jai dait

बहरून आले ऋतू सुगंधी,
तुझ्या नि माझ्यासारखे
का तू अशी मग दूर सखे,
जग तुझ्याविणा पारखे!!

mr.prasadp

आठवण बनून मनात येतेस तू,
मनालाही व्याकूळ करतेस तू,
अन् प्रेमाने पुन्हा तृप्त करतेसही तू,
अशी कशी ग तू.... अशी कशी ग तू....

Rahul Kumbhar

तू कशीही असलीस तरी,
सदा प्रेम करीं मी,
तुझे नामस्मरण नेहमी होवो,
असे जीवन जगेन मी

Jai dait

तुझ्या नावानेच सुरु होते विश्व माझे
तुझ्या नावातच सामावते जग माझे
असेन मी तुझाच गं नेहमी
जरी असेल आता, विश्व अलग माझे!!

prem.veda

स्वतःच्या परिनं जिवन जगण्याची
इथे प्रत्येकास संधी नसते.
प्रत्येक झाडाच्या नियती
हिरवीगार फांदी नसते.

santoshi.world

wahhhhhhhh kya bat hai .............. nice forum ...... maza ali saglya charolya vachayala ...........  :)

gaurig

तरिहि जगत रहावे,
हसत रहावे, फुलत रहावे,
हसता हसता,जगता जगता,
चारोळीला चारोळीने उत्तर देत रहावे........
Nice forum, really gr8.....  :)

santoshi.world

चार ओळी मिळून
एक चारोळी बनते,
मनातलेच आपल्या सर्वकाही
तिच्यात सामावलेले
असते.

- संतोषी साळस्कर.

rudra