चारोळी ला चारोळीने उत्तर.

Started by Rahul Kumbhar, July 07, 2010, 02:25:58 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

     राहुल सर,"  चारोळी ला चारोळीने उत्तर." आपला हा अभिनव चारोळी उपक्रम आवडला. थोडासा हटके असा हा प्रयत्न आहे. इतर चारोळीकारांना याद्वारे आपापल्या चारोळ्या सादर करण्यास एक चांगलाच वाव आपण दिला आहे. एकूण काय, त्यांच्या एकंदरीत सर्व चारोळ्यांना एका सुंदर माळेत गुंफून, त्या रंगी-बेरंगी फुलांचा आकर्षक हार, व त्याचा सुवास, सुगंध, परिमल, हा सदैव आपल्या बागेत अंगणात  घुमत, पसरत  राहील, ही आपली संकल्पना मला आवडली,

     असे अनेक नवं-नवीन स्तुत्य अनोखे, वेगळे उपक्रम राबवित राहणे  , मराठी कविताने आपल्या साऱ्याना आपली साहित्यातील अभिजात कला सादर करण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय, यासाठी त्यांचे अनेक आभार.

     माझेही एक चारोळी-पुष्प
     आपण आपल्या मालेत गुंफावे
     इतर चारोळी-कारांच्या कुसुमांसमवेत,
     मलाही मालेत स्थान द्यावे.

     ही फुले आहेत न-कोमेजणारी
     राहील कायम दरवळ तयांचा
     असाच प्रयत्न ठेवू साऱ्यानी,   
     आपापल्या फुलांना एकत्र जपण्याचा.

     शब्दांनी ओवलेली, चारोळ्यांनी गुंफलेली
     निखरलेली माला, मौक्तिक-सुवर्ण
     निस्सीम प्रेमाने, असीम आपलेपणाने,
     करूया "मराठी कवीतेस" अर्पण.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.06.2021-बुधवार.