चारोळी ला चारोळीने उत्तर.

Started by Rahul Kumbhar, July 07, 2010, 02:25:58 PM

Previous topic - Next topic

vijusai17

मनातले सर्व सांगण्यासाठी
शब्द हि अपुरे आहेत
पण शब्दांची गाथा
प्रकट करते मनातील व्यथा

vijay saindane

vijayvitkar

मनातील शब्द मनात राहिले

ती पत्रिका घेऊन आली आणि

लग्नाला यायचा हो

अस सांगितले

प्रशांत पवार

जे मनात आहे ते सांगत राहा,

जिच्यावर प्रेम करतो तिच्याशी हसत राहा

नाही तर,
काय?
तिच्या Lagna
"टेबल" आणि
"खुर्च्या" सजवत राहा..

anagha bobhate

तिच्या लग्नात टेबल खुर्च्या सजवताना
  डोळे भरून आले होते.
  तिच्या डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून
  आसवांना हसर्या चेहर्या मागे लपवले होते.

अनघा

प्रशांत पवार

चेहऱ्या मागच्या दुखावर,
हसून मात केली....
पण ति समोर आल्यावर ....
अश्रूंनीच दगा केली....

Jai dait

शब्दा-शब्दांनी जपली नाती  जगण्याची लावती ओढ  जीवन होते पूर्ण सुरांनी  सुख-दुखाची मिळता जोड       -जय

anagha bobhate

शब्दांनी नाती जोडली जातात.
  शब्दांनी नाती तोडली जातात
  ह्या दुधारी अस्त्राच्या जोरावर
  प्रत्येक नाती तोलली जातात.
 
  अनघा

mianirani

तिच्या मनात सामावले आहे मन माझे
तिच्या विश्वात गुंतले आहे विश्व माझे



प्रशांत पवार

तिच्यात गुंतून मी
रचले होते वेगळे विश्व माझे ...
तिलाही त्यात सामावून घ्यावं,
हेच होते एक गोड स्वप्न माझे...

Sonali Kose

तुझ माझ्यावर प्रेम होण
हे कधीच मला कळू दिला नाही
जेव्हा कळलं तेव्हा मात्र
डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाही

-✍🏻 सोनाली कोसे