लव्ह स्टोरी - भाग १

Started by केदार मेहेंदळे, July 20, 2011, 12:19:43 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

(लव्ह स्टोरी हि तीन भागातली कविता आहे. भाग १ आज पोस्ट करतोय. भाग २, २२/७ ला पोस्ट करीन आणि भाग ३, २५/०७ ला पोस्ट करीन. प्रेमात हुरहूर असते, आनंद असतो, दुःख असत, त्याग असतो. पण  प्रेम काय असत? एखादी व्यक्ती आवडल्या पासून, प्रेमात  काय काय होऊ शकत? बघुयात तर.)

{भाग १ प्रेमात मागे लागण, आवडण आणि prpose करण}

लव्ह स्टोरी - भाग १
:)

रोज संध्याकाळी bus  stop वर , ३१० च्या लाईनीत.
उभी असते ती जशी,  वाळवंटातली  ओंयासीस.
दिसावी ती म्हणून रोज,  तिच बस पकडतो.
तिच्या मागे चढण्यासाठी मी लाईनहि तोडतो.  :)
   
कधी सलवार, कधी जीन्स, कधी मिडी,  कधी साडी.
हतात म्याचींग   पर्स  अन डोळ्यावर गॉगलची  काडी.
पिंगट कर्ली केस तिचे अन कपाळावर फ्लिक्स.
हातात म्याचींग घड्याळ अन चपला हाय हिल्स.

बस येताच ती पुढे सरकते, मीही चढतो घुसून मधेच.
गर्दीत तिच्या मागेच रहातो, तिच्या destinetion चा  अंदाज घेत.
perfum च्या  गंधात तरंगत, तिच्या पिंगट केसांना नजरेनी कुरवाळतो.
तिच्या ओझरत्या स्पर्शानी मोहरत, गुलाबांच्या बागेत मी फिरतो.

पुढच्या stop  ला तिला window  seat  मिळते.
मी बसायच्या आधीच तिच्या शेजारची seat  भरते.
मागच्या seat वर बसून मग तिला बघत रहातो.
ती उतरलेल्या  stop वर  मीही उगाच रेंगाळतो.

रोज बघून बघून तीही आता ओळखायला लागली.
माझ्या कडे बघून एकदा हसल्या सारखीही वाटली.
मझ्या शेजारच्या seat  वर स्वताहून बसायला लागली.
कधी माझ्या साठी  शेजारची seat  हि ठेवायला लागली.

सुट्टे पैसे देण्या घेण्यात मी ओळख वाढवत नेली.
hallow, कस काय? ठीक आहे ना? इथवर मजल मारली.
नाव विचारल अन मैत्री आहो वरून ए वर आली.
आशीच एका संध्याकाळी मग सहज कॉफीहि झाली.

कधीतरी एकटीला गाठायची मनाला ओढ लागली.
मनातल्या मनात propose करायची practice चालू केली.
जुळून यावा योग म्हणून request देवाला केली.
पावसानी तेंव्हा अवचित येऊन दोस्ता सारखी help केली.

उभी होती पावसात, भिजत, बसची वाट बघत.
चिंब भिजलेल्या सौंदर्यानी पावसात आग लावत.
taxi घेऊन मी perfect timing ला तेथे  पोचलो.
"चल लवकर, बस आत"  दार उघडून मी म्हणालो.

भिजलेली ती बसली शेजारी अन हवा धुंद झाली.
तिच्या ओल्या सौंदर्यानी hart  bits तेज झाली.
ती हवा, ते संगीत अन ती भिजलेली संध्याकाळ,
rap music , भिजलेली ती, मी, अन तो पाऊस बेभान.

तिच्या धुंद श्वासांनी मी असा romantic झालो.
घेऊन हातात हात, तिच्या डोळ्यात पहात मी म्हणालो.
"तुझ्या सौंदर्याचा मी खरा भक्त आहे, तुझ्या 
क्षणाच्या सहवासा साठी माझ life कुर्बान आहे."


केदार ......

to be continue..... next on 22/07/2011......


http://marathikavita.co.in/index.php/topic,5732.0.html लव्ह स्टोरी - भाग 2
http://marathikavita.co.in/index.php/topic,5754.0.html लव्ह स्टोरी - भाग 3




केदार मेहेंदळे