चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

अरे कुठे गेले सगळे  :) :)
          विजय ,,,

भिरभिर शोधे नजर कुणा
हुरहूर वाटे का हो मना
येईल कुणीतरी नव पाहुणा
म्हणून का देता साद या जना ? ............. सुनिता  :)

Madhura Kulkarni

काळोखामधे या सरली किती युगे,
तुटले रे सारे, जीवनाचे धागे,

ते कोवळेसे नाते सुटले आता मागे,
जाळूनी तयांचे बांधले तु थडगे.....

गेला किती काळ, ओढण्यात हे गाडगे,
मागण्या प्रेमाची भिक हाती या वाडगे.....

~मधुरा कुलकर्णी.

sweetsunita66

जमली गझल जेव्हा मला, सारे जळून गेले...
अन सादर केली तेव्हा, सारे पळून गेले..... :D :D :D
           

वाह छान मधुरा !!  :) :) 
शब्दांचा हा खेळ अंगवळणी तुझ्या
     कुणी जळो कि प्रशंसा वाहो का तुजवरी बोझा,?
     कविता ,गझल अन चारोळ्या लिहिणे असे तुझी कला
     सर्वदा प्रशंसा अन प्रतिसाद देईन  मी तुला 
    कुणी प्रशंसक असो वा नसो ,मी पदो-पाऊली असणारच तुला .......... सुनिता  :)

कवि - विजय सुर्यवंशी.


अरे कुठे गेले सगळे  :) :)
          विजय ,,,

भिरभिर शोधे नजर कुणा
हुरहूर वाटे का हो मना
येईल कुणीतरी नव पाहुणा
म्हणून का देता साद या जना ? ............. सुनिता  :)
.
.
.
छान लिहलंत सुनिता...
.
.
.
"नव पाहुण्याचं जाउ द्या...
आता तुम्हीच बोला...
मनाचे गुज शब्दांतुन  खोला...
शब्दांच्या सोबतीने करा चारोळी अनं गजला..."
.
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
       (यांत्रिकी अभियंता)

sweetsunita66

विजय ,,जुनं ते सोनं असलं तरी नव ते हवं असते  :) :)

sweetsunita66

माझ्या चारोळी अन कवितांना कुठे अंत आहे
ही शब्द सरिता निरंतर झुळझुळ वाहे ,
कधी वाटे   मिलिंद ,मधुरा ,कवी , तुम्हा  ऐकावे जना
तुम्ही सर्वांनी फुलविलेल्या शब्द बागेची भुरळ पडे मना  :) :)

sweetsunita66

चांदण्यांच्या प्रकाशात फुले प्रितीची वेचताना....
साथ आम्हास चंद्राची होती....
प्रितीच्या अशा एकांत समयी....
सई माझ्या मिठीत होती....
                                विजय ,छान कविता :)

कवि - विजय सुर्यवंशी.

#317
धन्यवाद सुनिता...
.
.
.
"चारोळी करता करता...
कविता मग शृंगारीक झाली...
सईची सोबत अनं खट्याळ हसु...
कविता ही मग गंधित झाली..."
.
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
        (यांत्रिकी अभियंता)

sweetsunita66

गंध तुझ्या कवितेचा mk वर दरवळतो
आम्हा वाचकांच्या मनास भुरळ घालतो  :)

कवि - विजय सुर्यवंशी.

THANKS SUNITA....
.
.
.
"मी फक्त मांडल्या भावना...
संगतीने तुमच्या आम्हास शब्द सुचले...
भावना त्या छेडुनी पाहिल्या...
आपल्या प्रभावाने तयाचे काव्य जाहले..."
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
       (यांत्रिकी अभियंता)