चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

नसे मी इतकी विलक्षना
कि देवू कुणा मी प्रेरणा
तुम्हाच जवळी  हो  शब्द खजाना
मिळती आम्हा तुमच्या पाऊलखुणा ,,,,,,,,,सुनिता  :)

Madhura Kulkarni


जमली गझल जेव्हा मला, सारे जळून गेले...
अन सादर केली तेव्हा, सारे पळून गेले..... :D :D :D
           

वाह छान मधुरा !!  :) :) 
शब्दांचा हा खेळ अंगवळणी तुझ्या
     कुणी जळो कि प्रशंसा वाहो का तुजवरी बोझा,?
     कविता ,गझल अन चारोळ्या लिहिणे असे तुझी कला
     सर्वदा प्रशंसा अन प्रतिसाद देईन  मी तुला 
    कुणी प्रशंसक असो वा नसो ,मी पदो-पाऊली असणारच तुला .......... सुनिता  :)

धन्यवाद! खूप गोड....धन्यवाद सुनिता!!! :) :) :)

Madhura Kulkarni

माझी एक नवीन गझल.....

विचारात झुरणे मला मान्य नाही,
तुझे दूर जाणे मला मान्य नाही...

समोरून या घाव घालावयाला,
छुपे वार करणे मला मान्य नाही....

उगा वाद घालू नको तू अताशा,
अशी मात होणे मला मान्य नाही....

किती काळ संवेदना गोठवू मी,
मनी 'मात्र' कुढणे मला मान्य नाही....


बना शूर थोडे, भिडा संकटांना,
पराभूत होणे मला मान्य नाही....

~मधुरा कुलकर्णी.

sweetsunita66


समोरून या घाव घालावयाला,
छुपे वार करणे मला मान्य नाही.... छान  कविता मधुरा  :)
                   
                   काव्याच्या या जगती जागा असावे  प्रेमाला
                      नसो कुणा रागद्वेष ,नसो कुणाचा  छुपा घाला 
                          कुणी हीर ,कुणी रांझा ,संग-साथ लाभावे ,
                              प्रेम रसात तरंगताना फक्त तू न मी असावे ...   सुनिता  :)

कवि - विजय सुर्यवंशी.

छान उत्तर सुनिता.... :)
.
.
.
"प्रितीच्या या परिक्षेत.... राग अन द्वेशाचे प्रश्न ही येतील....
विरहात सोबती नसेल कुणी....
अन गैरसमज जागा प्रितीचे घेतील....
करुन त्रागा इतरांसी....
बंध नात्याचे विरतील....
आयुष्याच्या भरकटलेल्या क्षणी....
सहजतेच्या भेटी होतील....
अश्रु ढळतील मग पाणावलेल्या नयनी....
अन वेडी मने जुन्या आठवणीत बुडतील....
समजुन येतील आपुल्या चुका.....
अन माफींचे हेवेदावे होतील....
उजळुन येतील गंधित भावना....
अन बंध प्रितीचे पुन्हा जुळतील...."
.
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
        (यांत्रिकी अभियंता)

sweetsunita66

फार फार धन्यवाद विजय! :) !

मिलिंद कुंभारे

स्तब्ध मी स्तब्ध तू
स्तब्ध सारी राणे वने
स्तब्ध नदीचे हिरवे किनारे
प्रिये तुज सांगू कसे
गुज माझ्या मनीचे ...... :-\

sweetsunita66

कशी हि शांती अन कशी ही स्तब्धता
संपल्या साऱ्या चारोळ्या की ,
लिहिण्याची नसे उपयोगिता ,
कि म्हणावे झाली सर्वा उपलब्धी आता........ सुनिता :)

कवि - विजय सुर्यवंशी.

गंभिर आहे आशय :)
.
.

कशी हि शांती अन कशी ही स्तब्धता
संपल्या साऱ्या चारोळ्या की ,
लिहिण्याची नसे उपयोगिता ,
कि म्हणावे झाली सर्वा उपलब्धी आता........ सुनिता :)
.
.
.
.

शांतीच्या असल्या क्षणी कसल्या ह्या आरोळ्या....
जिवनातले विरल्या का भावना....?
की सुचेनात मग चारोळ्या....!!

मिलिंद कुंभारे

#329
धुंदी कळ्यांना अन धुंदी फुलांना!
शब्दरूप आले मुक्या भावनांना!

:) :) :)
सर्व जन चारोळ्या लिहित रहा ....
:D :D :D